अलिकडच्या काळात डेंग्यु, चकुनगुनिया, मलेरिया यासारख्या आजारांचं प्राबल्य वाढताना दिसत आहे. शिवाय काही नवे विकारही डोकं वर काढत आहेत. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं ठरतं. याकामी महत्त्वपूर्ण ठरणार्या काही टिप्स.
* तंदुरूस्त राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. दररोज व्यायाम करा. यामुळे चांगली झोप लागेल. वजन वाढणार नाही सहाजिकच हालचाल करताना त्रास होणार नाही.
* स्वच्छतेची काळजी घ्या. हात स्वच्छ धुवा, घरही स्वच्छ ठेवा. अन्नधान्य धुवून घ्या. यामुळे जंतू शरीरात प्रवेश करू शकणार नाहीत.
* स्वच्छ पाण्याचा वापर करा. पाणी दूषित असल्यास संबंधितांकडे तक्रार करा. बाटलीबंद पाण्याचा वापर करता येईल.
* पौष्टक अन्न खा. आहाराकडे लक्ष द्या. आहारात फळं, भाज्या यांचा समावेश करा. बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. कच्चे पदार्थ खाणं टाळा.
* नीट झोप घ्या. सात ते आठ तासांची झोप गरजेची असते. जागरण करू नका. यामुळे त्रास होऊ शकतो. सकाळी डोकं जड होऊ शकतं. नीट झोप झाली नाही तर वजनही वाढू शकतं.
तंदुरुस्त राहायचे तर..
Contents hide