भांडी घासण्याचं काम सोपं करणारं यंत्र म्हणजे डीशवॉशर. सध्या प्रगत तंत्रज्ञानाने युक्त असणार्या डीशवॉशरचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. आपली गरज आणि बजेट याचा विचार करुन योग्य वॉशरची खरेदी करावी. यात तपासण्याजोगी पहिली बाब म्हणजे डिश रॅकचं स्मार्ट डिझाईन आणि उत्तम सेंसर्स. समोर न दिसणारी कंट्रोल पॅनल्स, अतिरिक्त वॉश सायकल, कमीत कमी आवाज ही वैशिष्टंही सोयीची ठरु शकतात. काही डीशवॉशर वायफायशी कनेक्ट होऊन रिमोटवर चालतात. तुम्हाला त्याची गरज आहेतेठरवा आणि नंतरच खरेदी करा.
Contents hide