• Mon. Sep 25th, 2023

डासांच्या हल्ल्यामुळे मुख्यमंत्री रात्रभर हैराण !

ByGaurav Prakashan

Feb 20, 2021

भोपाळ : मुख्यमंत्र्यांची डासांनी झोप उडवल्याने एका इंजिनीअरला नोकरी गमावावी लागल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आपला दौरा आटपून रात्री शासकीय विर्शामगृहात आरामासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांचा डासांनी रात्रभर चावा घेतला आहे. त्यामुळे शासकीय इमारतीच्या असुविधा चव्हाट्यावर आल्या आहेत. सोबतच या इमारतीची निगा राखणार्‍या इंजिनीअरला नोकरी गमवावी लागली आहे. त्याला नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणाची चर्चा सोशल मीडियात जोरात सुरू आहे.
हे प्रकरण मध्यप्रदेशातील असून राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शासकीय विर्शामगृहात आराम करताना त्यांना डासांनी रात्रभर त्रास दिला आहे. ते बुधवारी सीधी येथे झालेल्या बस अपघाताची माहिती घेण्यासाठी मृतांच्या नातेवाईंकांना भेटण्यासाठी येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा सर्व दौरा आटपून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आराम करण्यासाठी शासकीय विर्शामगृहात गेले होते. त्याठिकाणी मच्छरदाणीची सुविधा नव्हती. मुख्यमंत्री झोपण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्यांना डासांनी चावायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्र्याची रात्री अडीच वाजता संबंधित अधिकार्‍यांना बोलावून त्यांची कानउघडणी केली आहे. त्यानंतर त्यांच्या खोलीत औषध फवारणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री झोपू शकले. पण पहाटे चार वाजता आणखी एक प्रताप घडला ज्यामुळे शिवराजसिंह चौहान यांची झोपमोड झाली. पहाटे चार वाजता छतावरची पाण्याची टाकी भरून ओसंडून वाहत होती. पण याची दखल कोणीच घेतली नाही. माहिती मिळाल्यानंतर पीडब्ल्युडीच्या अधिकार्‍यांनी मोटर बंद केली. सकाळी मुख्यमंत्री उठल्यानंतर सर्वप्रथम रीवा विभागाचे कमिशनर राकेश कुमार यांना बोलावून या अव्यवस्थेबद्दल त्यांची कानउघडणी केली. त्यानंतर कमिशनर साहेबांनी कनिष्ठ अधिकार्‍यांना चांगलेच झापले आहे. शिवाय सेवेवर असणार्‍या कनिष्ठ इंजिनीअरला निलंबित केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!