• Mon. May 29th, 2023

ट्राफिक नियमांचे पालन करणे गरजेचे – न्यायाधीश सचिन तट

ByGaurav Prakashan

Feb 5, 2021

उमरखेड : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत जात आहे त्यासोबतच वाढत्या वाहनांमुळे पार्किंगची समस्या भेडसावत असून नागरिकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उमरखेड येथील मुख्य न्यायाधीश सचिन तट यांनी वाहतूक शाखा उमरखेडच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात केले. यावेळी मंचावर वालचंद मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अविनाश पाटील, सह न्यायाधिष, आढाव सरकारी वकील, गणेश पवार – शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक, कैलास बोईनवार – सहायक शाखा व्यवस्थापक, संजय चौबे – पोलीस निरीक्षक, उमरखेड, विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक, बिटरगाव, चव्हाण, पोलीस निरीक्षक, महागाव वाहतूक शाखेचे प्रमुख सतीश खेडेकर उपस्थित होते.
३२ वा रस्ता सुरक्षा सप्ताह १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २0२१ पयर्ंत राबविण्यात येत आहे या अनुषंगाने सदर कार्यक्रम आयोजित केला असल्याचे प्रास्ताविका मधून सतिष खेडेकर यांनी स्पष्ट केले तर अपघात झाल्यावर काय करावे ? हा कार्यक्रम घेण्यामागील मूख्य उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. वाहनांची संख्या वाढत आहे त्यामुळे पार्कीग समस्या डोके वर काढत आहे याकरिता कायद्याची प्रभावी अंमल बजावण करणे गरजेचे आहे असे मत सचिन तट व्यक्त केले. दूर्धर आजारापेक्षा अपघातात मृत्यू पडणा?्या व्यक्तीची संख्या जास्त त्यामुळे नियमांची माहीती होणे आवश्यक आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ट्राफीक नियमांचे पालण करणे गरजेचे हसून इतरांना देखील समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *