• Tue. Sep 26th, 2023

टॅटूजचे फॅशनेबल विश्‍व

ByGaurav Prakashan

Feb 20, 2021

टॅटू रेखून घेणं ही अनेकंची पसंती असते. या क्षेत्राचा मागोवा घ्यायचा झाला तर त्यातल्या त्यात मिनीएचर डिझाईनच्या टॅटूची चलती आहे हे जाणून घ्यायला हवं. त्यांना ‘मनमिलिस्टिक टॅटू’ असं म्हटलं जातं. अवयवाचं सौंदर्य खुलवण्यासाठी असे छोटेसे टॅटूज काढले जातात. त्यांच्यामध्ये विविध गोलाकार, मंडलं, भूमितीय आकृत्या, नाजूक पानं, फुलं, पक्षी यांनी मोठं स्थान पटकावलं आहे. प्राण्यांच्या आणि इतर चित्रांवरून व्यक्तीचे गुणधर्म समजतात असंही मानलं जातं. त्यामुळे त्याचा अभ्यास करून आपण कसं वाटावं या दृष्टीनंही टॅटूंची निवड केली जात आहे. टॅटू काढणारे कलाकारही ही माहिती देतात. मोर हा सौंदर्याचं, मांजर हे रहस्यमय स्त्रीचं आणि सिंह हे नेतृत्त्वगुणांचं प्रतीक मानलं जातं. भूमितीय टॅटू हे स्पिरिच्युअल प्रकारच्या टॅटूमध्येही गणले जातात. उदाहरणार्थ, लोलकासारखी दिसणारी आकृती परॅमिडसदृश असल्याने तिचे अध्यात्मिक गुणधर्म जाणून घेऊन त्या आकृतीला महत्त्व देणारे लोक संबंधित अध्यात्मिक प्रवृत्तीचे मानले जातात. शिवाय विविध प्रकारची र%ं जडवलेले टॅटूही फॅशनमध्ये आहेत. हे ‘जेम-टॅटू’ अर्थातच सर्वांचं लक्ष पटकन वेधून घेतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!