• Wed. Sep 27th, 2023

टाळा केसांशी संबंधित समस्या

ByGaurav Prakashan

Feb 8, 2021

केस पांढरे होणं ही केवळ सौंदर्यविषयक समस्या नसून ती अनारोग्याची निदर्शकही असू शकते. अनुवंशिकता, पोषकतत्त्वांची कमतरता आणि थायरॉइडसारख्या समस्यांमुळेही केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. मात्र काही बाबी अनुसरुन त्या टाळता येतात. याविषयी.
केसांवर रसायनयुक्त श्ॉंपू तसंच हेअर कलरमधील रसायनांचा परिणाम दीर्घकाळपर्यंत राहतो. याच्या दुष्परिणामांमुळे केस कोरडे, पांढरे आणि कमकुवत होतात.
दररोज केस धुतल्याने शँपू आणि कंडिशनरमधल्या घातक रसायनांचे दुष्परिणाम दिसतात आणि केस पांढरे, निस्तेज होतात.
अतिताणामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. यामुळे केस गळणं, पांढरे होणं यासारख्या समस्या उद्भवतात.
अपुर्‍या झोपेमुळे ताण वाढून हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि केसांच्या समस्या निर्माण होतात.
सिगारेट आणि तंबाखूच्या सेवनामुळे शरीरात विषारी घटकांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळा.
जंक फूडचं सेवन करू नका. यामुळे शरीरात बी १२ हे जीवनसत्त्व, लोह, झिंक यासारख्या पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊन केस पांढरे होतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!