• Thu. Sep 21st, 2023

जिल्ह्य़ात ३९९ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ; मृतकांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ.!

ByGaurav Prakashan

Feb 15, 2021

अमरावती : जिल्हयात दिवसेदिवस कोरोना रुग्ण हे उच्चांक गाठत असून मृतकांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ात ३९९ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. परिणामी जिल्हयात २५ हजार २९४ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली असून १ हजार १0५ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. ४३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २३ हजार ७५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा आलेख हा घसरत असतांना काही दिवसापासून अमरावती जिल्हयात अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्य़ात कोरोना रुग्णांमध्ये तिहेरी आकडयानुसार वाढ होत असल्यामुळे सुज्ञ नागरिकांसह प्रशासनासमोर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून वारंवार नाग्रिकांना मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग तसेच वारंवार हात धुणे या त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असतांना देखिल जिल्हयात नागरीकमधील बिनधास्तपणा जाता जात नाही. प्रशासाने लग्न समारंभ असो वा राजकीय कार्यक्रम तसेच घरगुती कार्यक्रम या सर्वांसाठी नियमावली आखून दिली आहे. मात्र, केवळ आपल्या अहंकारापोटी म्हणा की, जवळ असलेला पैशांचा तमाशा करून इतरांच्या नजरेत स्वताला मोठे करण्यासाठी मोठया धुमधडाक्यात आजी अनेक ठिकाणी कार्यक्रम साजरे केल्या जात आहे. परिणामी नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होऊन बिमारी पसरविण्यास वाव मिळत आहे. प्रशासनाने या सर्व कार्यक्रमावर पुन्हा बंदी आणणे गरजेचे आहे अन्यथा परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्यास क्षणभरही वेळ लागणार नाही. इतकेच नव्हे तर बाजारात खरेदीसाठी जमलेली गर्दी, भाजीबाजारात भाजी विकणारा भाजी विक्रेता यांच्या तोंडाला कधीच मास्क लावलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक नागरिकांकडून केल्या जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष नागरिकांना स्वता सोबतच इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. अमरावती शहरातच नव्हे तर अमरावती जिल्ह्य़ांतर्गत येणार्‍या १४ ही तालुक्यामध्ये कोरोनाने आपले पाय पसरविण्यास पुन्हा सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वता काळजी घेवून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. १४ फेब्रुवारी रोजी जिल्हयात ३९९ रुग्णांची चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून जिल्हयात आतापर्यत २५ हजार २९४ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार १0५ रुग्णांवर उपचार सुरू असून २३ हजार ७५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!