अमरावती : जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी जास्त होत असून प्रशासनाने वाढत असलेल्या रूग्णसंख्येला ग्राह्य धरून जिल्हया ८ मार्च पर्यत लॉकडाऊनच कालावधी वाढविला आहे. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ६४0 रूग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्हयात आतापर्यत ३४ हजार २२५ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ८ रूग्णांचा मृत्यू झाला असुन आतापर्यत ५0३ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे. ५ हजारच्या जवळपास रुग्णांवर उपचार सुरू असून २८ हजार ८५६ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाकडून लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला असून आता ८ मार्च पर्यत लॉकडाऊन ठेवण्यात येणार असल्याचे आदेश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.विशेष म्हणजे या जनसामान्यासांठी रोजगाराचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला असून वाढत्या महागाईमुळे जनतेचे कंबरडे पूर्णताह मोडणार हे मात्र नक्की.जिल्हयात सातत्याने कमी जास्त होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या अमरावतीकरांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. विशेष म्हणजे मृत्युचा दर हा वाढला असून दर दिवसाला ८ ते दहा रुग्णांचा मृत्यू होत आहे.२७ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ८ रुग्णांचा नव्याने मृत्यू झाला असुन मृतकानी ५00 चा आकडा ओलाडला आहे. त्यामुळे ५0३ रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.६४0 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले असून आतापर्यत ३४ हजार २२५ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत.