• Tue. Sep 26th, 2023

जयंती धोळे झेंडावाळे बापूर .!

ByGaurav Prakashan

Feb 15, 2021
  जयंती धोळे झेंडावाळे बापूर ! (संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त)

जगात परिवर्तनवादी तथा इहवादी विचारांची फार समृद्ध परंपरा मागील हजारो वर्षापासून आपल्याला बघायला मिळते.
अनेक विचारवंत या जगाच्या पाठीवर होऊन गेले ज्यांचा कुठे नामोल्लेखही झालेला नाही.
नामोल्लेख न झालेल्या महान विचारवंतामध्येच महान क्रांतिकारी दुरदृष्टी असणारे “ संत सेवालाल महाराज “ यांचेही नाव गणले जाते. आजही आपल्याला समाजामध्ये धार्मिक मानसिकतेचे प्राबल्य असल्याचे दिसते. कट्टर धार्मिक मानसिकतेला परिवर्तन अमान्य असतो. आजपासून 282 वर्षापूर्वी म्हणजे 15 फेब्रुवारी 1739 रोजी , भीमा नायक रामावत आणि धरमणी याडी यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे नाव “ संत सेवालाल” ठेवण्यात आले . त्यांच्या जन्माच्या विविध आख्यायिका समाजात रूढ आहेत ,” पोरिया तारा “ म्हणून ओळखले जाणारे , भारत आणि इतर उपखंडात वसलेल्या इतर देशातील समग्र बंजारा , गोर बंजारा समाजाचे आराध्यदैवत व श्रद्धास्थान असलेले संत शिरोमणी , अखंड ब्रह्मांड नायक ,सेवालाल महाराज यांची आज 282 वी जयंती . या थोर तत्वज्ञ आणि विचारवंत महानायकाच्या विचाराला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शाळा महाविद्यालय व वेगवेगळ्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची जयंती साजरा करण्याचे आदेश दिलेत त्याबद्दल प्रथमशासनाचे समाजाच्या वतीने आभार मानतो . सेवालाल महाराज यांना चार भावंडे होती . यातून देवीच्या प्रकोपाने “बाणा “याचे निधन झाले होते . बापूंच्या घरी जवळपास तीन हजार सातशे गोधन होते . या गोधनाच्या पाठीवर धान्य घेऊन या प्रदेशातून त्या प्रदेशात धान्याची ने आण करण्याचे मोठे काम त्या काळात होत , या गोधणातून बापूला “गराशा ” या बैलावर खूप प्रेम होते बालपणापासूनच अत्यंत चाणाक्ष ,भरदार अंगकाठी ,पाणीदार डोळे ,मानेपर्यंत केस, लांब दाढी, भरदार अंगात भरारी सदरा ,धोतर डोक्यावर पगडी, कपाळावर चंदनाचा टिळा ,गळ्यात मोत्याची माळ ,कानात बाळी, यांच्या सर्व पोषाखामुळे संत सेवालाल महाराज यांना “ तोडावाळो “ म्हणून ओळखले जाते . तांडा वाडी-वस्ती , जंगल दऱ्यामध्ये वास्तव्य करून उदरनिर्वाहासाठी भारताच्याच नव्हे तर , जगाच्या पाठीवर पूर्वेकडून पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे संपूर्ण जग , भ्रमण करणाऱ्या समाजाला दिशा दर्शविणारे क्रांतिकारी महापुरुष सद्गुरू संत सेवालाल महाराज. रूढीग्रस्त आचार-विचार आधुनिक काळात तकलादू होऊन, परंपरागत जीवन कालबाह्य होईल, अशी दूरदृष्टी ठेवून तर्कवादी व काळाचे चक्र ओळखून , येणाऱ्या काळात काय-काय घडण्याची शक्यता आहे . याबाबतचे सत्य वचन मांडणारे तत्वज्ञानी म्हणुन सेवालाल महाराजांची ओळख आहे . बंजारा समाजात पोरिया तारा म्हणून ओळखले जाणारे

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  “हमारोतांडो हमारो राज” अशी घोषणा देऊन
   भमी यारो मातो तोडे वाळो !
   जूरुरी जहाज लोटे वाळो !
   कटक नदी न थोपेवाळो !
   संत सेवालाल महाराज यांनी त्या काळी दिलेली वचने आज सत्य ठरत आहेत
   यी सत युग छ् !
   येर बाद कल यूग आये !
   बाप बेटार पटकोणी !
   घरोघरेम कलह चाली ए !
   आळीपाळी म नंगारा वाजी ये I
   घर घर नायकी आय !
   रपिया कटोरो पाणी वक जाय !
   गोमातान चारो कोणी मळ |
   वाना वाना र दख आय !
   दखेर डॉक्टर परख करीय !
   बेमारी हात कोणी आव !

  विषमतेच्या पायावर उभा असलेला समाज , धर्म , कधीही कोणाचे कल्याण करू शकत नाही. “ कोई केनी भजो मत ! कोई केनी पुजो मत “. असे म्हणत पारंपारिक अंधश्रद्धेचा फोलपणा जगासमोर अधोरेखित करून परिवर्तन , हेच जीवनाचे सर्वात सुंदर आणि यथार्थ वर्णन असल्याचे , संत सेवालाल महाराजांनी आपल्या विचारांतून स्पष्ट केले . परिवर्तनाच्या खांद्यावर स्वार होऊन. समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला. सेवाभाया चे बोल आजही बंजारा समाजाच्या कंठात सुरक्षित आहे पूर्वे पासून पश्चिमेकडे उत्तरेपासून दक्षिणेकडे मालवाहतूक करत असताना उदरनिर्वाहासाठी जगभर भ्रमण करणाऱ्या समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य या बा ब्रम्हचारी , तपस्वी, महाराजांनी केले. त्यांनी सांगितलेली वचने , बोलीभाषेतील लडी , भजन करी मंडळी पारंपरिक वाद्याचा म्हणजे “ थाळी नंगारा “ याचा वापर करून समाजापर्यंत पोहचण्याचे महान कार्य करीत आहे. पूर्वीपासूनच समाजावर अंधश्रद्धेचे सावट होते . अवैज्ञानिक विचारांचा पगडा होता , धार्मिक कर्मकांड , यामुळे समाजाचे अहित होतांना सेवालाल महाराजांना दिसत होते . तेव्हा यांनी बुद्धिप्रामाण्यवाद , तर्कशुद्ध , अंधश्रद्धा मुक्ती व कल्याणकारी समाज निर्मितीचा ध्यास मनामध्ये घेतला होता , तेव्हा यांनी आपल्या वचनातून म्हटले होते. “ कोई केनी भजो मत ! कोई केनी पुजो मत “ याचा अर्थ असा की , प्रत्येक कार्याची ओळख करून , घ्या त्याचे मूल्यमापन, करा खरे आणि खोटे याचे परीक्षण करण्याची क्षमता अंगी बाळगा . स्वतःला समजून घ्या आणि मगच त्या विचाराला मान्यता किंवा अंगिकार करा .
  आजही बंजारा समाजाने आपली स्वतंत्र संस्कृती टिकून ठेवली आहे . तांडा असो किंवा शहरी भाग असो आज आपल्याला “नायक , कारभारी , समाजातील पेचप्रसंग सोडवितांना दिसतात. आजही बंजारा समाजात “एक भाषा एक पेहराव “ ही संस्कृती टिकून असल्याचे चित्र आपल्याला दिसते . संत सेवालाल पुरोगामी कार्य, कृती, करणाऱ्यापैकी एक होते. त्यांच्या काळात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, स्त्रिया अंधश्रद्धेला बळी पडायचा. त्यांनी आपल्या भजनातून , वचनाच्या वाणीतून धार्मिक कर्मकांडात गुंतून राहू नका , पशुबळी देऊ नका .समाजाचा कष्टाचा पैसा व वेळ वाया जाईल असे कोणतेही कार्य करू नका . देवाला प्राण्यांची बळी देऊ नका हे सांगताना ”
  किडी-मुंगी न साई वेस !
  म्हणजे भूतलावरील सर्व किडया मुंग्यांना जीवन जगता यावे यासाठी संत सेवालाल महाराज यांनी प्रयत्न केले . प्राणीमात्रावर प्रेम करणारा हा अहिंसावादी संत . संत सेवालाल महाराज यांच्या काळामध्ये ईश्वराला खूष करण्यासाठी पशुबळी ची परंपरा होती . बोकड ,पशुबळी ची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न महाराजांनी केला .त्यासाठीच महाराजानी गहू , गूळ व तुप यांचा “शिरा “प्रसाद म्हणूण वापरला व तो अग्नी ला अर्पण करावा आणि सर्वांना वाटावा अशी परंपराच समाजामध्ये रुढ करण्याचा प्रयत्न संत सेवालाल महाराजांनी केला . याच शिकवनी नुसार आजही बंजारा समाजामध्ये संत सेवालाल महाराज यांना शिऱ्याचा “भोग ; दिला जातो. संत सेवालाल महाराज यांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला . समाजाला अंधश्रद्धेच्या बाहेर काढताना समाजातील अशिक्षित, सामान्य ,कष्टकरी ,धर्मभोळेपणा असलेली निरक्षर अडाणी लोकां मधील भोळेपणाचा फायदा घेऊन भ्रम निर्माण करून, दिशाहीन बनविणार्या धार्मिक कर्मकांड करणाऱ्या, परोपजीवी, भोंदू साधुसंता पासून, बुवाबाजी पासून चमत्कारी शक्ती असल्याचे दाखवून समाजाला गंडवणाऱ्या लोकापासून सावध राहण्याची शिकवण भायांनी दिली. अंधश्रद्धा मुक्त , व्यसन मुक्त समाज, सेवा भायांना अपेक्षित होता. या महान विचार वादी संताचे कार्य जगासमोर लिखित स्वरूपात नाही .गोरबोली बंजारा ही फक्त बोलीभाषा असल्याने त्याची नोंद इतरत्र कुठेही झालेली दिसत नाही. जेव्हा हा समाज अस्थिर होता, तेव्हा त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध आला नव्हता. त्या काळी गोरधाटी म्हणूण वेगळी ओळख होती . पण व्यापराच्या हेतुने लेदणी च्या माध्यमातून धान्याची ने-आन / उलाढाल करत असताना समाज भटकंतीचे जीवन जगत असल्यामुळे सर्वच धर्माशी संबंध येऊ लागला .आणि त्या सर्व धर्माचा पगडा बंजारा समाजातील रूढी, परंपरा अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या जाळ्यात बंजारा समाज पुरता अडकला . तसे मुळात गोर समाज , जात , धर्म, आणि दैव, कर्मकांड यापासून मुक्त होता . प्राचीन काळापासूनच हा समाज आपली वेगळी ओळख ठेवून वावरत आला आहे . तांड्याची संस्कृती ही फार प्राचीन व समृद्ध संस्कृती म्हणून ओळखली जाते . बंजारा तांडा संस्कृती ही विज्ञानवादी , मानवतावादी समतावादी व निसर्गपूजक असल्याचे आपल्याला आढळते . या समृद्ध संस्कृतीचा वारसा मौखिक बोलीभाषेतून ठेवावयाचे. बोलीभाषेतून सेवाभायाच्या वचनातून /माध्यमातून समाजात आजही टिकून आहे . बदलत्या काळाच्या ओघात थोड्याफार प्रमाणात बदलाची झळ तांडयाच्या बंजारा समाजाच्या संस्कृतीलाही झालेली आज पाहायला मिळत आहे. वेगळी परंपरा ,वेगळी ओळख, वेगळया पेहरावामध्ये आटी, टोपली, हासलो ,भूरीया, घागरो , काचळी,रपीयारी हार , वेगळी बोलीभाषा , वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाणारे वेगवेगळे सणोत्सव , लग्नाच्या अनोखी पध्दती , त्यात गायले जाणारे ढावलो प्रकार , होळी या सणाला निसर्गाला अनुसरून वापरला जाणारा केसूला चा रंग, व वेगळा नृत्यप्रकार . गीताच्या स्वरूपात ढफडयाच्या वादनाच्या तालावर ठेका घेणारी लेंगी संस्कृती , काळाच्या ओघात लुप्त होणार नाही यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा . नेहमीच बंजारा समाजाने संचित समृद्ध संस्कृतीचे जतन व संवर्धन करून आपले जीवन फुलवीत आला आहे .देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतच्या जडणघडणीत या विस्थापित बंजारा जनसमूहांच्या समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या उपेक्षित लोक समूहाने कसे जीवन जगावे ? यासाठी समाजाला लढण्याचे, व जगण्याचे बळ संत सेवालाल महाराज नी दिले .संत सेवालाल महाराज यांची आज 282 वी जयंती भारतामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे . त्यानिमित्ताने अख्खा बंजारा समाज व पृथ्वीतलारील समग्रमानव जातीकडून या महान संताला विनम्र अभिवादन..!

   श्री. दत्तराव पंतू पवार (बंजारा)
   (स. शि.)
   जिल्हा समन्वयक
   गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान नागपूर. तथा सदस्य, तांडा सुधार समिती नागपूर
   71 ,जेतवन सोसायटी शास्त्री लेआऊट नागपूर
   mail ID: pawardatta65@gmail.com
   Mobile No. 7972428457