जपा बचतीचा मंत्र

दोस्तांनो, करीअरला आकार देतानाच बचतीचा मंत्रही जपायला हवा. लवकर नवृत्त व्हायचं आणि आवडीच्या गोष्टींना वेळ द्यायचा हा जगभर मान्यता पावत असणारा नवीन ट्रेंड आहे. तुम्हीही तो अनुसरु शकता. म्युच्युअल फंडांच्या सिप योजनांमध्ये गुंतवणूक करून लवकर नवृत्त होता येतं. समजा आता तुम्ही २५ वर्षांचे आहात आणि १५ वर्षांनी नवृत्त व्हायचं आहे तर सिपमधल्या गुंतवणुकीला सुरूवात करा. त्यासाठी दरमहा दहा हजार रुपये गुंतवायला सुरूवात करा. प्रत्येक वर्षी त्यात दोन हजार रूपयांची भर घाला.
या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला तर १५ वर्षांनी तुमच्याकडेसाधारणपणे ९५ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रूपये असतील. हा पैसा सस्टमॅटिक विड्रॉवल प्लानमध्ये गुंतवता येईल. या योजनेत विशिष्ट व्याजाने महिन्याला ठराविक रक्कम मिळते. म्हणजे महिन्याला ८0 ते ८५ हजार रूपयांचं उत्पन्न मिळतं. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लान म्हणजे एसडब्ल्यूपी. यात एकहाती पैसा गुंतवून महिन्याला ठराविक रक्कम मिळवता येते. तुम्हाला लवकर नवृत्त होऊ न आवडीनवडी जपायच्या असतील तर नोकरीला लागल्यावर लगेचच बचतीला प्राधान्य द्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!