• Mon. Sep 25th, 2023

छत्रपती शिवाजी महाराज

ByGaurav Prakashan

Feb 19, 2021
  वंदन छत्रपती राजे शिवबांना ।
  हिंदवी सु-स्वराज्य संस्थापकांना ॥धृ॥
  जनकल्याणकारी शिवबा राजे ।
  द्रष्टे जाणते शिव छत्रपती राजे ॥
  बहुजनाचे प्रतिपालक राजे ॥
  तव सतकर्मांची करू अर्चना ॥1॥
  वर्ण-जातीभेद, पंथ-धर्म भेद ॥
  सु-स्वराज्यात ना कोणत्याच भेद ॥
  गनिमांवर सदाच लक्ष्यभेद ॥
  राजेंच्या कार्याची करू आराधना ॥2॥
  परस्त्रीचा मातेसम अत्यादर ॥
  स्त्रीयांवर ना कधीच अत्याचार ॥
  शिवराय स्वराज्य माहेरघर ॥
  स्मरण करू शिवबांच्या स्मृतींना ॥3॥

कवी प्रा. अरुण बुंदले

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  रुख्मीनी नगर, अमरावती
  मो. 8087747609