चंद्रपूर : चंद्रपुरातील चीचपल्ली येथे करोडो रुपये किंमत असलेला बांबू प्रोजेक्ट आज आकस्मिक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रोजेक्ट मध्ये शेकडो लोकांना रोजगार मिळणार होता पण उद््घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रोजेक्टला आग लागल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान तर झालेच पण यावर शेकडो लोकांचा रोजगार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बांबू प्रोजेक्ट ला आग लागली कशी? की यामागे काही छडयंत्र आहे हे चौकशीतून समोर येईलच पण या घटनेमुळे बांबू प्रोजेक्ट व्यवस्थापणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणाचीही जीवहानी झाली नाही.
Contents hide