• Mon. Jun 5th, 2023

चिंता वाढवणारी गाठ

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021

शरीराच्या कुठल्याही भागात आलेली गाठ चिंता वाढवणारी ठरते. कर्करोगाच्या शक्यतेनं मन घाबरं होतं. पण प्रत्येक गाठीकडे अशा भयभीत नजरेने पाहणं चुकीचं आहे.
बरेचदा स्तनात सिस्ट बनतं जे एक प्रकारे चरबी साठण्यामुळे असू शकतं. यामुळे कोणताही त्रास होत नाही आणि गाठ जिरवणंही खूप सोपं पडतं. स्तनात अशा साध्या गाठी असतील तर आहार संतुलित करणं हा चांगला मार्ग आहे. आहारातील मीठाचं प्रमाण कमी करणं सर्वात चांगलं. शरीरात आयोडिनची कमतरता असेल तर स्तनात गाठ होऊ शकते. अशा वेळी आयोडिनयुक्त मीठाचा वापर करणं, आयोडिनयुक्त पदार्थांचं सेवन वाढवणं इष्ट ठरतं. योग्य पद्धतीने मसाज देऊनही या समस्येवर उपाय करता येतो. मसाजमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि गाठीतील द्रव बाहेर येऊन गाठ जिरण्यास मदत होते. चुकीच्या मापाची आणि आकाराची अंतर्वस्त्रं वापरल्यास अकारण दाब आल्याने गाठ निर्माण होऊ शकते. म्हणूनच योग्य मापाची अंतर्वस्त्रं वापरावीत. कॅफनमुळे गाठींचा विकास होतो. हे लक्षात घेता कॅफनयुक्त पदार्थांचं सेवन वज्र्य करणं चांगलं. स्तनात गाठ जाणवत असेल तर नियमित परीक्षण करत रहावं. गाठीचा आकार वाढणं, आजूबाजूची जागा लाल होणं, वेदना जाणवणं अशी कोणतीही लक्षणं दसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *