ग्राफिक डिझायनर म्हणून काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. कल्पकतेला वाव देणारं हे क्षेत्र आहे. एखाद्या मासिकाचं किंवा पुस्तकाचं मुखपृष्ठ कसं असावं याचा निर्णय ग्राफिक डिझायनर घेतो. वृत्तपत्र, कॉर्पोरेट कंपन्यांचे अहवाल, स्मरणिका यांच्या डिझायनिंगची जबाबदारीही ग्राफिक डिझायनर्सवर असते. सेवा आणि उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी लागणारी ब्रोशर्स, पोस्टर्स, पॅम्पलेट्स डिझाइन करण्याचं कामही ग्राफिक डिझायनर्स करतात.
ग्राफिक डिझायनिंगमध्येही टाईप डिझाइन, पब्लिकेशन डिझाइन, आयडेंटिटी डिझाइन, एन्व्हायर्नमेंटल ग्राफिक्स, मोशन ग्राफिक्स आणि इन्फो ग्राफिक्स यापैकी एका प्रकारात विशेष प्राविण्य मिळवता येतं. ब्रॅंड आयडेंटटी डिझायनर्स, लोगो डिझायनर्स, लेआऊट आर्टिस्ट, क्रिएटव्ह डायरेक्टर्स, डिझाइन कन्सल्टंट्स म्हणूनही या क्षेत्रात काम करता येतं. या क्षेत्रात येणार्यांकडे कल्पकता, निर्णय घेण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य हवं. डिझाइन स्टुडिओ, अँड एजन्सी, शैक्षणिक संस्था, मार्केटिंग कंपन्या आणि प्रकाशन संस्था ग्राफिक डिझायनर्सच्या शोधात असतात. बारावी किंवा पदवीनंतर ग्राफिक डिझाइनचा कोर्स करता येतो. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझायनिंगमध्ये डिझायनिंगच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अडीच वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही आहे.
ग्राफिक डिझायनरची नवी वाट
Contents hide