• Mon. Jun 5th, 2023

गोंगाटामुळे विस्मरणाचा धोका..!

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021

विस्मरण हा एक नानाविध समस्या उत्पन्न करणारा आजार असून आत्तापर्यंत तो वृद्धापकाळाशी संबंधित होता. मात्र अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे तो लहान वयातच सतावू लागल्याचं बघायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर रहदारीच्या रस्त्यांवर राहणार्‍या लोकांना विस्मरणाचा आजार जडण्याची वाढती शक्यता असल्याचा शोध संशोधकांनी लावला असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. रहदारीच्या रस्त्यांपासून ५0 मीटरच्या आत असणार्‍या घरांमध्ये राहणार्‍या लोकांना सततच्या गोंगाटामुळे विस्मरणाची व्याधी जडण्याची शक्यता सात टक्क्यांनी वाढते असं त्यांचा निष्कर्ष सांगतो. अशा रस्त्यांपासून ५0 ते १00 मीटर अंतरावर राहणार्‍या लोकांमध्ये हा धोका चार टक्क्यांनी तर १0१ ते २00 मीटर अंतरावर राहणार्‍यांमध्ये तो दोन टक्क्यांनी कमी होतो असं त्यांनी केलेल्या परीक्षणात आढळून आलं आहे. प्रामुख्यानं नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि धुराचे कण यासारखे प्रदूषक घटक रक्तप्रवाहात मिसळून दाह सुरू होतो आणि हृदयविकार आणि मधुमेहासारखे आजार जडतात असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. रक्तप्रवाहाद्वारे हे प्रदूषक मेंदूपर्यंत पोहोचून मेंदूचे आजार जडतात असं संशोधकांच्या या गटाने सिद्ध केलं आहे. या आजारांमध्ये विस्मरण हा महत्त्वाचा आणि सुरुवातीला होणारा आजार आहे. वेळीच परिस्थिती सावरली नाही तर हा आजार गंभीर धोके उत्पन्न करू शकतो.

Images Credit : Loksatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *