अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती मिळण्यासाठी व गृह विलगीकरणाबाबतीत निर्णयांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार अमरावती शहरासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. दरम्यान विलगीकरणातील रुग्णांनी नियमभंग केल्यास 25 हजार दंड करण्याचेही जिल्हाधिका-यांचे आदेश असून, त्यानुसार शहरातील दोन रूग्णांना दंडाची नोटीस जारी करण्यात आली आहे
गृह विलगीकरणातील रुग्ण अनेकदा घराबाहेर पडून नियमभंग करतात. त्यामुळे त्यांच्या घरावर फलक लावावेत, तसेच ते घराबाहेर पडून नियमभंग करत असतील, नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना करावे व तक्रारीनुसार कारवाईचे करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले होते. पालिकेच्या पथकाने नियंत्रण कक्षाला प्राप्त तक्रारींवरून विद्यापीठ परिसर, रवीनगर, अमर कॉलनी परिसराला भेट देऊन गृह विलगीकरणातील रुग्णांकडून नियमभंग होतो किंवा कसे, याची तपासणी केली. त्यात दोन रूग्णांनी नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या दोघांनाही प्रत्येकी 25 हजार दंड ठोठावण्याची नोटीस जारी करण्यात आली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांच्यासह पालिका कर्मचारी व पोलीस शिपाई यांचा पथकात समावेश होता.
महापालिकेकडून नियंत्रण कक्षासह संकेतस्थळही सुरु आहे. गृह विलगीकरणासाठी अर्ज करण्यासाठी रुग्णांनी या कक्षाला रूग्णाच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र राहण्याची सोय, त्यांना असलेली लक्षणे ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी व तसेच विलगीकरणाचा फॉर्म भरण्यासाठी www.homeisolationamt.com हे संकेतस्थळ वापरावे. त्याचप्रमाणे, भूषण राठोड यांच्याशी 7030922851, गिरीश चव्हाण यांच्याशी 9518996174 वर, जितेंद्र हर्षे यांच्या 9405144050, धीरज काळे 9403050714, जिया उल्लाखान फखरूल्ला खान 8177839595, अजहर खान इजामुर्रहिम खान 9021187430, सय्यद रजियोद्दीन काईम 9767700443, मो. सलमान मो. रऊफ 7620965233, मो. सादिक मो. युसुफ 7709439313, ज्ञानेश्वर अवधूत 9767018297, मनीष सांचेला 9084136091 किंवा स्वप्नील रंगारी यांच्याशी 8793717686 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.