नवी दिल्ली : गुन्हा किंवा गुन्हेगार ठरवण्यामध्ये संबंधित व्यक्तीचं वय, लिंग किंवा व्यवसाय महत्त्वाचा कसा ठरू शकतो? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टूलकिट प्रकरणावरून देशात सुरू असलेल्या चर्चेवर उपस्थित केला आहे. या प्रकरणात २२ वर्षांच्या दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर त्यावरून दिल्ली पोलिसांना लक्ष्य केले जात होते. त्याविषयी बोलताना अमित शहांनी दिल्ली पोलिसांचे सर्मथन केले आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करत आहेत. या घटकांवरून गुन्ह्याचे स्वरूप कसे ठरवता येईल? असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला आहे. दिशा रवीच्या वयामुळे दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली जात आहे.
स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हे टूलकिट ट्वीट केल्यानंतर हा वाद सुरू झाला. हे टूलकिट २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठीची पूर्वतयारी होती या संशयावरून ग्रेटा थनबर्ग, दिशा रवी, शंतनु मुळूक, निकिता जेकब हे आरोपीच्या पिंजर्यात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या आडून कट-कारस्थान करण्यासाठीच्या कथित टूलकिट प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकारण ढवळून निघाले आहे. हा कसला ट्रेंड आहे, जिथे एखाद्या गुनबद्दल बोलताना लोकं संबंधित व्यक्तीचे वय, व्यवसाय किंवा लिंगाविषयी बोलत आहेत? असे अनेक २२ वर्षीय लोक आत्तापयर्ंत अटक झाले असतील. दिल्ली पोलिसांनी काही पुराव्यांच्या आधारावरच अटक केली असेल, असे म्हणत शाह यांनी माध्यमांवरही देखील टीका केली. थनबर्गने ट्वीट केलेल्या टूलकिटचा काही भाग संपादित केल्याचा आरोप तिच्यावर आहे. दिशा रवीला तिच्या बंगळुरूमधल्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.
Related Stories
October 2, 2023
October 2, 2023