आपल्या परिसरात वा इतरत्र औषधी गुणधर्मांनी युक्त विविध वनस्पती असतात. मात्र, त्या वनस्पतींविषयी तसंच त्यांच्या गुणधर्मांविषयी माहिती असायला हवी. त्यादृष्टीने आज रूईच्या पानांचे उपयोग पाहू..
हाताच्या बोटात किंवा कुठेही काटा रूतला तर सुईने त्याजागी वरची त्वचा काटा काढण्यासारखी करावी आणि तिथे रूईच्या पानाचा चिक लावावा. थोड्या वेळाने काटा आपोआप बाहेर येतो. मधमाशी, गांधीलमाशी, चावुन तिचा काटा तसाच राहिला असेल तर तोही निघतो.
कान दुखत असेल तर रूईच्या पिकलेल्या पानाला थोडा तुपाचा हात लावून गरम करावं. मग त्याचा रस कानात घालावा. हा उपाय दोन-तीनदा केल्यास आराम पडेल.
पांढरी रूईची फुले सुकवून थोडी गरम करून त्याची पूड करावी आणि दोन चिमूट मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
मुका मार लागल्या ठिकाणी रूईची पाने तव्यावर गरम करून त्याने शेकावे.
मधुमेही रूग्णांनी रूईची पानं तळपायाला बांधून मोजे घालावे आणि ते चार तासपर्यंत ठेवावे. यामुळे रक्तातील साखर कमी होते.
विंचू चावला किंवा विषारी किटकदंश झाला तर त्याजागी रूईचा चिक लावावा. यामुळे दंशाच्या वेदना कमी होतात.
रूईच्या पानांचा डिंक नायटा झालेल्या जागेवर लावला तर नायटा तसंच इतरही त्वचारोग बरे होतात.
रूईची फुले सुकवून त्याचं चूर्ण करून मधातून घ्यावं. यामुळे अस्थमा, दमा आणि श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार बरे होतात.
गुणकारी रूईची पाने
Contents hide