• Tue. Sep 26th, 2023

खासगी रुग्णालयात कोरोना लसीच्या एका डोससाठी २५0 रुपये

ByGaurav Prakashan

Feb 28, 2021

नवी दिल्ली:देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा येत्या 1 मार्चपासून सुरू होत आहे. या टप्प्यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे, पण यात लोकांना लसीसाठी पैसे मोजावे लागतील. वृत्त संस्थांनी सूत्र्यांच्या हवाल्याने सांगितले की, खासगी रुग्णालयात लस घेण्यासाठी 250 रुपये द्यावे लागतील. यात रुग्णालयांच्या सर्व्हिस चार्जचा समावेश आहे. तिकडे, गुजरातमध्ये राज्य सरकारने खासगी रुग्णालयात 250 रुपयांना लस मिळणार असव्याची घोषणा केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

1 मार्चपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या टप्प्यात 12 हजार सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस दिली जाईल. यात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना आणि 60 वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाईल. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, या कॅटेगरीमधअये 27 कोटी लोक आहेत.