अमरावती : विदर्भ खाटीक समाज सेवा समिती अमरावती (र.न.महा./६८२/२००५) तर्फे शनिवार २७ फेब्रुवारी २०२१ रोजी समाजातील उपवर-वधु आणि पालक परिचय मेळावा तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित समाज बांधवांचा सत्कार खाटीक समाज सभागृह चांगापुर (रेल्वे क्रासिंगजवळ) येथे आयोजित करण्यात आला होता; मात्र कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याने आयोजित कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय समितीच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
समिती अध्यक्ष श्री. दीपकराव घन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत शनिवारी (ता.१३) हा निर्णय घेण्यात आला.
एक वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून जनजीवन पूर्वपदावर येत असताना समाजाची गरज लक्षात घेता प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून निवडक नागरिकांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचे यापूर्वी ठरविण्यात आले होते. त्या दृष्टीने व्यापक तयारी करण्यात आली होती. समाजबांधवांना त्याबाबतचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र; गत आठवड्यात कोरोना संक्रमणाची भयावह स्थिती बघता सार्वजनिक आरोग्य व समाज हिताच्या दृष्टीने हा मेळावा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
बैठकीला अध्यक्ष दिपकराव घन, उपाध्यक्ष पुरुषोत्तम विरुळकर, उपाध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव कराळे, सचिव गोपाल हरणे, कार्यकारिणी सदस्य सुरेशराव वानखडे, राजाभाऊ लोयटे, मनोहरराव सदाफळे, सल्लागार देवरावजी कुरहेकर, देविदासराव माहुरे, अविनाशराव हिरेकर, अरविंद वानखडे, गणेशराव नेहर आदी उपस्थित होते.
समितिचे उर्वारित सदस्य कोषाध्यक्ष किसनराव माकोडे, सहसचिव राजकन्याताई खंडारे, कार्यकारणी सदस्य श्रीरामजी नेहर, सुधीरराव लसनकर, अशोकराव पारडे, विजयराव हिवरकर, श्रीमती निर्मलाताई पारधे, राजेंद्र माकोडे, विनायकराव खराटे (बुलडाणा), सुनंदाताई मंडवे, रामदासराव धनाडे, बाळाभाऊ हरणे (अकोला), योगेशराव गोतरकर (यवतमाळ), विश्वनाथजी गोतरकर, प्रा. डॉ. श्रीराम माहुरे (पुसद) , प्रा. रमेशराव खंडार, रामदासजी विलेकर (चांदूरबाजार), दशरथराव कंटाळे, किशोर दुर्गे, विजय पारडे, हरीश माहुरकर, गोपाळराव कंटाळे, लक्ष्मणराव हिवराळे, महिला प्रतिनिधी अनिताताई ढोके, अनिताताई सदाफळे, यंग ब्रिगेड सदस्य राजेश हिरेकर, राजेश बिहार, ज्ञानेश्वर माहुरकर, अरविंद वानखेडे, विठ्ठल मदने, राजेंद्र माकोडे, संतोष मसने, निलेश पारडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत डोईफोडे (वाशीम), सुनील दुर्गे, निलेश गायगोले यांनी या निर्णयाला सहमती दर्शविलेली आहे. मेळाव्याची सुधारित तारीख स्थिती सुधारल्यानंतर निश्चित केली जाणार आहे. याची समाजबांधवांनी नोंद घ्यावी तसेच दक्षता पाळावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आलेले आहे.
खाटीक समाजाचा परिचय मेळावा स्थगित
Contents hide