आजकाल मॉड्युलर किचनची क्रेझ आहे. या आधुनिक स्वयंपाकघरात सगळ्या गोष्टी अगदी हाताशी असतात. ही रचना अत्यंत आकर्षक दिसते. पण त्यासाठी आधी स्वयंपाकघराचा आकार आणि रचना लक्षात घ्या. स्वयंपाकघर लहान असल्यास काऊंटरखाली ओव्हन, ग्रील, मायक्रोवेव्ह या सर्वांची व्यवस्था करा. डिश वॉशरसाठीही ही जागा योग्य ठरु शकते. गॅस किंवा वीज या दोहोंपैकी एकावर ओव्हन चालतात. आपल्यासाठी कोणता योग्य आहे याची तपासणी करा. तुमच्या स्वयंपाकाची पद्धत आणि घरातील सदस्यांची संख्या यावर ओव्हन अथवा मायक्रोवेव्हचा आकार आणि क्षमता ठरवा.
Contents hide