• Mon. May 29th, 2023

कोरोना व्हायरस; काय करायला पाहिजे

ByGaurav Prakashan

Feb 23, 2021

कोरोनाचं भय आज साधारणतः सर्व लोकांना वाटत आहे. त्यातच नवीन कोरोना आला आहे. या नवीन कोरोनानुसार आताही जिल्हेचे जिल्हे बाधीत होत आहेत. त्यातच यवतमाळ, अमरावती व अकोला ही शहरं बंद करण्यात आली आहे. कोरोना काही ऐकायला तयार नसल्यानं लस निघाल्या तरी पुन्हा पुर्वीसारखीच स्थिती निर्माण होईल का? अशी भीती व्यक्त केली आहे. नागपूरातही मा. महापौरांनी म्हटलं की पाचवी ते आठवीच्या शाळा बंद. कारण ज्यावेळेपासून पाचवीच्या शाळा उघडण्यात आल्या. त्यावेळेपासून कोरोना वाढायला लागला. त्यातच मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की जर आठ दिवसात आम्हाला एक जरी विद्यार्थी कोरोनाबाधीत व्यक्ती सापडला तर नाईलाजानं राज्यात लाकडाऊन करावं लागेल.मुलाची थर्मल चाचणी दररोज करायची आहे. त्यातच एखादा मुलगा सापडेलच. पण विशेष सांगायचं झाल्यास ही लहान मुलं कोरोनाचे वाहक आहेत, बाधक नाहीत. त्याचं कारणही तसंच आहे.

विशेषतः विशिष्ट वयातील लहान मुलं ही जास्त खेळत असतात. जी शाळेत जात असतात. ती मुलं घरी चक्करबिल्ला, चेंडू, भोवरा, लपंडाव, तसेच पतंगाच्या मागेही धावत असतात. तसेच शाळेतही वेगवेगळे खेळ खेळत असतात. त्यातूनच त्यांचा व्यायाम होत असतो. या धावण्यामुळं वा व्यायाम करण्यामुळं त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाह हा सतत हालता असतो अर्थात त्यांच्या शरीरातील रक्ताचं वहन होत असते. त्यांचे मायबाप त्या खेळण्यासाठी कितीही ओरडत असले तरी. तरी त्याच खेळण्यातून रक्ताचे वहन होत असल्यानं शरीरातील सततच्या चयापचयाच्या क्रियेमध्ये काही विषारी वायू जे निर्माण होतात. ते विषारी वायू रक्ताच्या या वहनक्रियेत उत्सर्जीत होतात. त्यातच या वहनप्रक्रियेत शरीरात मुलांच्या सतत खेळण्यानं त्यांची श्वासोच्छवासाची जी गती वाढते, त्या गतीमुळं शरीरात तीव्र व शुद्ध ऑक्सीजनचा पुरवठा होतो. जे शुद्ध ऑक्सीजन आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवत असतं. त्यामुळं आपोआपच मुलांची प्रतिकारकशक्ती वाढते.
साधारणतः अशी प्रतिकारशक्ती वयाच्या बाराव्या वर्षापासून पुढील वर्षाच्या मुलांमध्ये जास्त असते. ती मुलं जास्त खेळत असतात. तसेच मैदानी खेळंही जास्त खेळत असतात. त्यापेक्षा वयानं लहान असलेली मुलं खेळत असली तरी ती तेवढ्या प्रमाणात मैदानी खेळ खेळत नाहीत आणि जी एकदम लहान असतात. ती खेळत असली तरी त्यांचं खेळणं शुन्य ते दहा टक्के एवढंच असतं. त्यामुळं ती सतत आजारी पडत असतात.

कोरोनाबाबत अभ्यास केल्यास आता आपल्याला हे जाणवेल की ह्या मुलांमध्ये जास्त कोरोना आजार बळावलेला नाही. पण ते कोरोनाचे वाहक ठरले. बरोबर आहे ते. त्याचं कारण म्हणजे कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. हा कोरोना मुलांच्याही अंगावर बसतो. कपड्यावर बसतो. तो व्हायरस कोणत्या ठिकाणी असेल, हे काही सांगता येत नाही. अशावेळी ही लहान मुलं, त्यांना कितीही सांगीतलं तरी मोठ्या व्यक्तींसारखी वागत नाहीत. ती अल्लड असतात. ती लहान मुलं ही कोणालाही हात लागत असतात. आपली मित्र, आपली मैत्रीण यांना हात लावत असतात. तिच लहान मुलं ही आपल्या घरातील मोठ्या माणसांच्या म्हणजे आई, वडील, मोठा भाऊ, मोठी बहिण, काका, मामा,शेजारी पाजारी यांच्या संपर्कात येतात. तिच लहान मुलं त्यांच्या संपर्कात आल्यानं ह्या कोरोनाचा प्रकार वाढत आहे.
मोठ्या माणसांना कोरोना लवकर होतो काय? असा जर प्रश्न केला तर त्याचे उत्तर होय असे आहे. कारण मोठी माणसं ही लहान मुलांएवढी खेळत नाही. ती लहान मुलांएवढी व्यायाम करीत नाही. म्हातारी माणसं तर अजिबातच व्यायाम करीत नाही आणि करीतही असतील तर पाहिजे तेवढा व्यायाम करीत नाहीत. त्यामुळं ही मुलं जर अशा म्हाता-या किंवा मोठ्या माणसांच्या संपर्कात आल्यास ती लवकर बाधीत होतात. शिवाय वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्तीही कमी झालेली असते. त्यातच त्यांचा व्यायाम जास्त होत नसल्यानं शुद्ध ऑक्सीजनचा त्यांना पुरवठा होत नाही. त्यातच कँल्सीअम, सोडीअम कमी झालेलं असते. बीपी, शुगर असतो. वयोमानानुसार प्रतिकारशक्तीही नसते. अशावेळी ही म्हातारी किंवा जास्त वयातील माणसं लहान मुलांच्या संपर्कात आल्यास लहान मुलांना कमी व मोठ्या माणसांवरच कोरोनाचा जास्त प्रभाव पडतो.

आज पीकांवरही सेंद्रीय खत फवारलं जात नाही. कंपोस्ट आणि शेणखतंही आज मिळत नाही. सगळीकडं युरीया व सल्फेटनं रान माजवलं आहे. हे सल्फेट विषारी असतं. त्यातील विषारीपणा पीकं शोषून घेतात. तिच पीकं आपण जेव्हा खातो, तेव्हा त्या पीकांतील विषारी घटक आपल्या शरीरात जातात. ती विषारी घटकं शेवटी आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. ते घटकं एवढा परिणाम करतात आपल्या शरीरावर की आपली प्रतिकारशक्ती अतिशय कमी होते. त्यामुळे आता छोट्या छोट्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यातील कोरोना हा एक आजार आहे.
मुख्यतः कोरोना होवू नये यासाठी आपण काळजी घेतो. हात धुतो, साबन, लिक्वीड आणि सानिटायझर लावतो. त्यामुळं कोरोना फटकून आहे आपल्याजवळून. पण समजा झालाच तर आपले धाबे दणानते. आपल्याला तेव्हा वाटायला लागते की आपण गेलो. आता यातून वाचूच शकत नाही. त्यातच काही मंडळी ही भीतीनं मरण पावली. पण मनाची तयारी करावी की कोरोना झाला तरी चालेल. पण तो आपल्या शरीरात वाढू नये. त्यासाठी समजा कोरोना झालाच तर दुर्लक्ष न करता आपली प्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा विचार करावा. केवळ विचारच नाही तर ते विचार अंमलात आणावे. ज्या वस्तूनं प्रतिकारशक्ती वाढते, त्या वस्तू खाव्यात. जसे आंबट पदार्थ लिंबू, संत्री, मोसंबी. ज्यूस घ्यावे जसे.मोसंबी, अननस. तसाच काढाही घ्यावा. मिरे, कलमी आणि हळदीचा. त्यानं प्रतिकारशक्ती वाढू शकते. तसेच आपण कोरोनाशीच नाही तर इतरही अनेक रोगाशी लढू शकतो.
कोरोनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सर्वात महत्वाची गोष्ट ही की या कोरोनाकाळात सर्वांनी व्यायाम करण्याची गरज आहे. व्यायामानं शरीरातील रक्ताचे वहन होईल व कोलेस्टेरालची पातळी हळूहळू कमी होती. त्यातच रक्तात ऑक्सीजन मिसळेल नव्हे तर भूकही भरपूर लागेल. याच जेवनातून शरीराला असणारे पोषक घटक जसे सोडीअम, कँल्सीअम मिळेल. ज्यातून दुखणं खुपणं वाटणार नाही व आपण कोणत्याच आजारावर बळीही पडणार नाही.

महत्वाचं म्हणजे लहान मुलं ही जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना वाहकाचं काम करीत आहेत. ती कोरोना बाधक ठरत नाही. त्यांच्यात तीव्र प्रतिकारशक्ती असल्यानं ती बाधीत होत नाही. तेव्हा लहान मुलांच्या बाबतीत घाबरण्याचं कारण नाही. मात्र हे नक्की की त्यांच्यापासूनच सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळं समजा घरी लहान लहान मुलं असतील, तर ती मुलं कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जी मुलं शाळेत जातात. ती मुलं घरी आली की त्यांना स्वच्छ अंघोळ करायला लावावी. तसेच त्यांचे वस्र दररोज धुवावे. जेणेकरुन ती लहान मुलं कोरोना वाहक बनणार नाहीत व कोणालाही कोरोना होणार नाही. मग राज्यच नाही तर देशही कोरोनामुक्त होईल असं म्हणता येईल.

    अंकुश शिंगाडे

    नागपूर
    ९३७३३५९४५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *