अमरावती : २३ फेब्रुवारी जिल्ह्य़ात कोरोनाचा विस्फोट झाला असून, आतापर्यतची सर्वाधिक रुग्ण संख्या म्हणुन ९२६ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात आतापर्यंत ३१ हजार १२३ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हयात ६ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन ४७१ रूग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे. ५ हजारांपेक्षा जास्त रुग्णावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. तर २६ हजार पेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासुन जिल्हयात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाच्या पहिल्या वेळेपेक्षाही दुसर्या लाटेमध्ये रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रशासनाने जिल्हयात आठ दिवसाचा लाऊकडाऊन घोषीत केला असतांना देखिल र्मयादित वेळेत खरेदी करण्यासाठी बाजारपेठामध्ये मोठया प्रमाणात प्रचंड गर्दी होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. इतक्या भयावह परीस्थितीतही अनेक अमरावतीकरांमध्ये बेजबाबदारपणा दाटूदाटू भरला आहे. कोरोना हा प्रकारच मुळात नसल्याचे अनेकांचे मत असल्यामुळे मास्क तसेच सोशल डिस्टन्सींग अशा नियमांचे दिवसा ढवळया उल्लंधन करीत असल्याचे दिसुन येत आहे. जिल्ह्य़ात वाढत्या कोरोना रुग्णाबरोबरच मृतांचा आकडा देखील झपाटयाने वाढत चालला आहे. रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील कमी झाला झाल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे जनसामान्याचे हाल होत असुन रोजगाराचा प्रश्न पुन्हा एैरणिवर आला आहे. नागरिकांच्या अशाच बेजबाबदार वागणुकीमुळे जिल्हयात पुन्हा लाकडाऊनचा काळ वाढविण्याची भीती निर्माण झाली आहे. २३ फेब्रुवारी जिल्हयात कोरोनाचा विस्फोट झाला असून आतापर्यतची सर्वाधिक रुग्ण संख्या म्हणुन ९२६ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ३१ हजार १२३ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हयात ६ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, ४७१ रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे. ५ हजार पेक्षा जास्त रुग्णावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. तर २६ हजार पेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Related Stories
October 2, 2023
September 28, 2023