• Mon. Sep 25th, 2023

कोरोनामुळे ८ रुग्णांचा मृत्यू,७५४ रुग्ण पॉझिटिव्ह

ByGaurav Prakashan

Feb 27, 2021

अमरावती : जिल्हयात कोरोनाचा पुन्हा तांडव सुरू झाला असून आज कोरोनामुळे ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत जिल्हयात ४९५ रुग्णांनी आपला जिव गामावला आहे.७५४ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हयात आतापर्यत ३३ हजार ५८५ कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ६ हजारच्या जवळपास रुग्णांवर उपचार सुरू असून २८ हजार ३५८ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे नियमा तोडणार्‍यावर प्रशासनाकडून सक्तीची कारवाई करण्यात येत असुन अनेकांना पोलिसांचा मार देखिल खावा लागत आहे.
जिल्हयात २0 ते २५ दिवसापासुन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झालेली वाढ प्रशासनाला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यास बाधक ठरली. २२ ते १ मार्च पर्यत जिल्हयात लॉकडाऊन घोषीत असुन काही भागात कोरोनो प्रतिबंधात्मक नियम हे कडक करण्यात आले आहेत. जिल्हयाअंतर्गत येणार्‍या १४ ही तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. अंनजगाव सुजी, परतवाडा,चादुर बाजार, धामनगाव रेल्वे, दर्यापूर, नांदगाव खंडेश्‍वर यासह इतर भागात मोठया प्रमाणात रुग्ण आढळुन येत आहे. तसेच अमरावती शहरातील साईनगर, राजापेठ यासह अनेक भागात रुग्णांची संख्या १00 च्या वर गेल्यामुळे शहरासह ग्रामिण भागात तब्बल ४0 च्या जवळपास प्रतिबंधात्मक झोन घोषीत केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अमरावती जिल्हयात कोरोना रुग्णां विषयी रोजच धक्कादायक माहिती समोर येत असुन रुग्णसंख्या अगदी तिव्र गतीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वाढत असलेला थंडीचा जोर आणि प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून होत असलेले उल्लंधन या दोन महत्वपूर्ण कारणामुळे कोरोनाचा मोठया प्रमाणात फैलाव होत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. रुग्ण संख्या वाढु लागल्याने शहरासह जिल्हयातील रुग्णालये व दवाखाने पुन्हा गच्च भरल्याचे दिसून येत आहे.जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाकडून सक्तीचे पाऊल उचलले जात असून त्रिसुत्री नियमांचे पालन न करणार्‍या विरूध्द मोठया प्रमाणात कारवाईचा बडगा उचलल्या जात आहे.विशेष म्हणजे परिस्थती ही चिंताजनक असतांना सुध्दा रस्त्यावर फिरणारे नागरिक हे अदयापही नियमांचे पालन करतांना दिसून येत नाही. प्रशासनाने सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहे. कोरोनामुळे ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत जिल्हयात ४९५ रुग्णांनी आपला जिव गामावला आहे.७५४ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हयात आतापर्यत ३३ हजार ५८५ कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ६ हजारच्या जवळपास रुग्णांवर उपचार सुरू असून २८ हजार ३५८ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे नियमा तोडणार्‍यावर प्रशासनाकडून सक्तीची कारवाई करण्यात येत असुन अनेकांना पोलिसांचा मार देखिल खावा लागत आहे.