नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा संसर्ग कमी जास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्ध झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणार्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहेत. विशेष करून लहान मुलांच्या शारीरिक विकासावर कोरोनाचा मोठा परिणाम होणार आहे. कोरोनामुळे मुलांच्या मृत्युदरात वाढ होणार असून, त्यांचे शिक्षणही विस्कळीत होण्याची शक्यता आहे, ही भीती सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालामध्ये स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायन्र्मेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालात स्टेट ऑफ इंडियाज एन्वायन्र्मेंट २0२१ मधून व्यक्त करण्यात आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांच्यासह देशभरातील ६0 हून अधिक पर्यावरणवाद्यांनी एकत्रितपणे हा अहवाल गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारत आता महामारी जनरेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील ३७.५ कोटी मुले (नवजात अर्भकांपासून ते १४ वर्षांच्या मुलांपयर्ंत) दीर्घकाळापर्यंत कायम राहणार्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेर्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतील. तसेच शैक्षणिक नुकसानापयर्ंत दुष्परिणाम दिसून येणार आहेत. जगभरात ५0 कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अध्यार्हून अधिक मुले ही भारतात आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, आता कोरोना विषाणू आमच्यासाठी दीर्घकाळासाठी काय सोडून जाणार आहे याचा तपास करण्याची वेळ आली आहे. एक पिढी अस्वस्थता, कुपोषण, गरिबी आणि शैक्षणिक लाभांबाबत दुर्बलतेने घेरली गेली आहे. त्याबरोबरच पर्यावरणाचा निरंतर विकासासाठी उपयोग करण्याचेही आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणीय आव्हानांच्या काळात आम्ही उदरनिर्वाह आणि पोषण सुरक्षेबाबत सुधारणा करू शकू.