नवी दिल्ली : कॉमेडी नाईट विथ कपिल या कार्यक्रमाचा लोकप्रिय निवेदक आणि कॉमेडी स्टार कपिल शर्मा आणि त्याची मैत्रीण गिन्नी चतरथ यांनी २0१८ मध्ये लग्न केले होते. २0१९ मध्ये त्यांना कन्यार% प्राप्त झाले होते.
त्यानंतर आज कपिलने ट्विट करून आपल्या चाहत्यांना पुत्रर% प्राप्त झाल्याची गोड बातमी दिली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, नमस्कार आज सकाळी आम्हावर पुत्रर%ाची कृपा झाली असून, देवाच्या आशीर्वादाने आई आणि मुलाची तब्येत उत्तम आहे, आपल्या प्रेम, शुभेच्छा, प्रार्थनेसाठी आणि आशीर्वादासाठी मी आपला आभारी आहे. कपिल शर्माच्या या ट्विटवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे. कपिल शर्मा आणि गिन्नी चरत यांचं हे दुसरं अपत्य असून पहिल्या मुलीचे नाव आनायरा आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात ती एक वर्षाची झाली आहे.
कपिल शर्माच्या देशविदेशातील चाहत्यांकडून झालेल्या शुभेच्छांच्या वषार्वामुळे ट्विटरवरती कपिल शर्मा टॉप ट्रेंडमध्ये आहे.
कॉमेडी स्टार कपिल शर्माला पुत्ररत्न
Contents hide