सध्या अनेकंचा केस कलर करुन घेण्याकडे कल असतो. आकर्षक रंगछटेत रंगवलेले केस खूप सुंदर दिसतात. पण हेअर कलर करताना काही बाबींची काळजी घ्यायला हवी. कलरला पूरक मेक अप कसा करावा याविषयी.
केस बरगंडी किंवा रेडिश रंगाशी साधम्र्य साधणारे असतील तर लिपस्टिकच्या रंगाकडे लक्ष द्यावं. मेक अपमध्ये मरून किंवा ब्राउन रंगाचा वापर करावा. डोळ्यांच्या मेक अपमध्ये लाईट किंवा स्पार्कलिंग ग्रीन कलरने हायलाईट करावं. ब्लश आणि लिपस्टीकमधल्या डार्क मरून, मोव किंवा ब्राऊन शेड्स लूकला उठाव देतात. गालांसाठी रोजी क्रिम ब्लशही वापरू शकता. केसांचा रंग ब्राऊन किंवा त्यासारख्या मिळत्या-जुळत्या शेडचा असेल तर न्युड मेक अपचा पर्याय सर्वोत्तम आहे. या मेक अपमध्ये आयब्रो हायलाईट करा. मस्कारा आणि लिपग्लॉस लावायला विसरू नका. ब्लशसाठी पीच, ब्रॉंज किंवा इतर न्युट्रल कलर्सचा वापर करता येतो. डोळे हायलाईट करण्यासाठी मेटॅलक क्रिम बेस्ड आय श्ॉडोचा वापर करा. ब्लाँड हेअर कलरसाठी तुम्ही ब्लॅकऐवजी पर्पल शेड वापरू शकता. लपस्टकसाठी ब्राईट पिंक वापरू शकता.
केस कलर करताय?
Contents hide