• Mon. Jun 5th, 2023

केसांच्या आरोग्यासाठी..

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021

सद्य:स्थितीत वाढते ताणतणाव, प्रदूषण, सकस आहाराचा अभाव यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढीस लागल्या आहेत. अशा स्थितीत केसांचं आरोग्य राखणं गरजेचं ठरतं. मात्र,केसांवरील उपचार अत्यंत खर्चिक असतात. अशा वेळी काही सोप्या आणि स्वस्त उपायांनी केसांची काळजी घेण्याचा प्रयत्न करावा. केस फारच तेलकट असतील तर माईल्ड शँपू आणि कंडिशनर वापरा. केसांसाठी महत्त्वाचा असतो तो योग्य आहार. हिरव्या पालेभाज्या, फळं भरपूर प्रमाणात खा. हिरव्या पालेभाज्यांमुळे केसांना आवश्यक असणारी पोषणमूल्यं मिळतात. डाय किंवा कलर करत असाल तर मेंदी किंवा मेंदी आणि आवळा यांचं मिर्शण लावा. डायमध्ये घातक रसायनांचा भरणा असतो. या रसायनांमुळे केस गळण्याच्या तक्रारी सुरू होतात. मेंदी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे तर आवळा केसांच्या समस्यांवर गुणकारी असतो. केसांच्या वाढीसाठी काही नैसर्गिक उपायही करता येतील. अध्र्या कप दहय़ात थोडा लिंबाचा रस मिसळा. हे मिर्शण केसांना लावा. पंधरा मिनिटांनंतर केस धुवून टाका. यामुळे केसांना चमक येते. या उपायामुळे कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती मिळेल. केस धुण्यासाठी शक्यतो रिठा, शिकेकाई वापरणं लाभदायक ठरतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *