• Sun. Jun 11th, 2023

काळवेळ…….

ByGaurav Prakashan

Feb 10, 2021

    काळवेळ कोण । आहे बांधणारा? ।
    कोण जिंकणारा । नियमाला? ।।
    काळ फक्त आहे । विश्वात अमर ।
    त्यांनीच समर । घडविले ।।
    काळाने पाहिले । समृद्ध भारत ।
    अनंत चालत । राहूनिया ।।
    आजही कुठेच । नाही थांबणार ।
    काळ राहणार । तिन्ही लोकीं ।।
    काळ मुठीमध्ये । कशाला येईल ।
    कशाला जाईल । गुलामीत? ।।
    आपणच सर्व । काळाचे गुलाम ।
    शरीरात राम । काळामुळे ।।
    सर्वांना मर्यादा । काळाला सोडून ।
    जाणे सामावून । काळामध्ये ।।
    अजु झुकणार । काळाच्या समोर ।
    नित्य कमजोर । काळापुढे ।।

    शब्दसखा-
    अजय रमेश चव्हाण,
        तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
        मो.८८०५८३६२०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *