फिटनेससाठी जीममध्ये जाणे हा योग्य उपाय असला तरी याठिकाणी जाताना आपल्या किटमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी असायलाच हव्या. त्याची माहिती घेऊ या.
* वर्कआउट करताना येणार्या घामाची दुर्गंधी टाळण्यासाठी डिओचा वापर करा. जीम बॅगमध्ये सौम्य सुगंधाचा डिओ ठेवा.
* जीममधील उपकरणांना अनेकांचे हात लागत असतात. सहाजिकच तिथे असंख्य किटाणू असतात. त्यांच्या संसर्गाने आजारपण येऊ नये यासाठी बॅगमध्ये हॅण्ड सॅनटायझर ठेवा आणि त्याचा वापर करा.
* वर्कआउटनंतर शरीरातील उर्जा मोठय़ा प्रमाणावर खर्च झालेली असते. त्यामुळे काही वेळा अशक्त वाटू लागते. अशा वेळी उपयोग पडेल असा एखादा एनर्जी बार बॅगमध्ये ठेवा.
* एखादा नवीन व्यायाम प्रकार ट्राय करताना किंवा नव्याने जीमला जात असाल तर बॅगेमध्ये पेन रिलव्हर क्रम किंवा जेल हवेच. वर्कआउटदरम्यान मांसपेशींमध्ये लचक भरुन वेदना जाणवल्यास याची मदत होते.
* बरेचदा जीममधून परस्पर एखाद्या कामासाठी धावावे लागते. अशावेळी बॅगमध्ये बाथ वाईप्स असतील तर मोठी सोय होते. या वाईप्सच्या वापराने फ्रेशनेस मिळतो.
काय असावे जीम किटमध्ये?
Contents hide