• Sun. May 28th, 2023

काजोलने सांगितले गोविंदासोबत काम न करण्याचे कारण..!

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021

मुंबई : बॉलिवूडची चुलबुली अँक्ट्रेस काजोलने दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजही ती बॉलिवूडमध्ये अँक्टिव्ह आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये काजोलने जवळपास सर्व बॉलिवूड हिरोंसोबत काम केलेय. सुपरस्टार गोविंदासोबत मात्र तिची जोडी कधीच जमली नाही. आता इतक्या वषार्नंतर काजोलने या मागच्या कारणांचा खुलासा केला आहे. ९0 च्या दशकात गोविंदाचा बॉलिवूडचा हिरो नंबर १ होता. आजही त्याची क्रेज कमी झालेली नाही. त्या काळात गोविंदाने बॉलिवूडच्या जवळपास सर्व दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केले. काजोलसोबत मात्र तो कधीच मोठ्या पडद्यावर दिसला नाही. एका ताज्या मुलाखतीत काजोलने यामागचे कारण सांगितले.
गोविंदासोबत मी जंगली नावाचा सिनेमा सुरु केला होता. राहुल रवैल हा सिनेमा बनवणार होते. सिनेमावर कामही सुरु झाले होते. आम्ही फोटोशूटही केले होते. मात्र चित्रपट सुरू होण्याआधीच बंद झाला. एका फोटोशूटशिवाय आम्ही पुन्हा कधीच एकत्र शूटींग केले नाही. गोविंदा एक उत्तम अभिनेता आहे. लोकांना हसवणे खूप कठीण काम आहे आणि गोविंदा ते खूप चांगले करतो, असे काजोल म्हणाली. भविष्यात गोविंदासोबत काम करणार का? असे विचारले असता, भविष्याचे तर माहित नाही. पण संधी मिळाली तर मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल, असे ती म्हणाली. काजोलने त्याकाळी शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगण अशा अनेकांसोबत काम केले. शाहरूख व तिची जोडी कमालीची लोकप्रिय झाली. आजही ही जोडी प्रेक्षकांना भावते. दुसरीकडे गोविंदाची करिश्मा कपूर व रवीना टंडनसोबतची केमिस्ट्री गाजली. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *