• Tue. Sep 26th, 2023

करीनाने दुसर्‍यांदा दिला मुलाला जन्म, आता नावाची उत्सुकता

ByGaurav Prakashan

Feb 22, 2021

मुंबई : करीना कपूर खान दुसर्‍यांदा आई झाली आहे. करीनाने दुसर्‍यांदा मुलाला जन्म दिलाय. वांद्रे इथल्या ब्रीज कॅण्डी रुग्णालयात सकाळच्या वेळी करिनाने मुलाला जन्म दिला. शनिवारी रात्री करीनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी करीनाने बाळाला जन्म दिला. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेय. गेल्या अनेक दिवसांपासून करीनाच्या दुसर्‍या बाळासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अनेक चाहत्यांनी तर करीनाच्या घरी भेट म्हणून खेळणीदेखील पाठवून दिली होती. चाहत्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी सैफ करीनाला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑक्टोबर २0१२ मध्ये सैफ आणि करीनाने लग्नगाठ बांधली होती. २0१६ मध्ये करीना कपूर पहिल्यांदा आई झाली. सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यानं मोठा वाद देखील निर्माण झाला होता. मात्र यानंतर तैमूर अली खान या सोशल मीडियावरील सर्वात जास्त लोकप्रियता मिळवणारा स्टार किड ठरला. तैमूरच्या अवखळ अंदाजातले फोटो सोशल मीडियावर सतत ट्रेण्ड झाले तैमूर पाठोपाठ सैफ आणि करीनाच्या आयुष्यात आणखी एका चिमुकल्याचं आगमन झालंय. आता सैफ करीना दुसर्‍या बाळाचे नाव काय ठेवणार यावरुनदेखील चर्चा रंगू लागल्या आहेत. कपूर सोशल मीडियावर कायम चर्चेत राहिली. बेबी बंपमधे अनेक फोटो करीनाने शेअर करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. करिनाचे बेबी बंपसोबत योगा करतानाचे फोटोदेखील चांगलेच व्हायरल झाले होते. तैमूरनंतर करीना दुसर्‍यांचा आई झालीय. गरोदरपणाची बातमी दिल्यापासूनच करीना कपूरची सोशल मीडियावर सतत चर्चा होती. करीना कपूरच्या बाळाच्या आगमनाच्या बातमीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सोशल मीडियावर करीना कपूर तिच्या गरोदरपणातील हटके लूकने कायम ट्रेण्डमध्ये पाहायला मिळाली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!