- ऋतू कोणता कैसे कळते ?
- झुळझुळ वारे वाहू लागते
- पर्णे सारी गळू लागते
- फुला फुलांच्या वेली अन्
- आंब्यालाहि मोहर येते
- कोकिळेचे मंजुळ गाणे
- आनंदाचे वाहती वारे
- वसंत ऋतु हे नाव त्याचे….
- ऋतू कोणता कैसे कळते ?
- कडकड कडकड सूर्य तापतो
- गरगर गरगर वारा वाहतो
- लाही लाही धरणी होते
- भेगाळलेली माता दिसते
- चोचीमधूनी चारा आणून
- निपचित होती सारी पाखरे
- छाया शोधी गुरे -बापडे
- गरम झावांच्या वाफेमध्ये
- बघा होरपडती लहान-मोठे
- चांदण्या रात्री मौज वाटे
- ग्रीष्म ऋतू हे नाव त्याचे….
- ऋतू कोणता कैसे कळते ?
- कडकड कडकड वीज कडकडते
- भरभर भरभर वारा सुटते
- सरसर सरसर पाऊस बरसते
- गडगड गडगड नभ गरजते
- थुई थुई थुई मोर नाचते
- हिरवे हिरवे गवत डोलते
- नदी ,नाले अन् पाट वाहते
- मृदुगंधातून न्हाऊन निघते
- वर्षा ऋतु हे नाव त्याचे…..
- ऋतू कोणता कैसे कळते ?
- लाजरी, गोजरी, गुलाबी होते
- गार गार ते वारे वाहते
- हिरवेगार ती शाल पांघरते
- शुभ्र पांढरे मेघ दाटते
- चटक चांदण्यांची चादर
- पांघरून ती झोपी जाते
- सुकाळ ,सुगीच्या या दिवसांची
- सारे मंडळी वाट पाहते
- हुळहुळलेल्या गारव्यात मग
- गर्द सोनेरी पहाट नहाते
- शरद ऋतू हे नाव त्याचे….
- सौ. शितल राऊत,
- अमरावती
Contents hide