• Mon. Sep 25th, 2023

उभ्याने पाणी पिणे धोकादायक

ByGaurav Prakashan

Feb 28, 2021

पाणी म्हणजे जीवन. एकवेळ अन्नाशिवाय राहता येईल पण पाण्याशिवाय जगणं शक्य होणार नाही. पाणी हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक असा घटक. पाण्याच्या प्रमाणासोबतच ते पिण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. बरेच जण उभ्यानेच किंवा घाईघाईत पाणी पितात. पण हे चुकीचं आहे. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अगदी किरकोळ वाटणारी ही बाब आपलं नुकसान करू शकते. उभ्याने पाणी प्यायल्यामुळे उद्भवणार्‍या धोक्याविंषयी..
उभ्याने पाणी पिताना नसांवर ताण येतो आणि शरीराला काहीतरी धोका निर्माण झाल्याचा समज झाल्याने प्रतिकारशक्ती सक्रिय होते. यासोबतच अन्ननलिका आणि श्‍वासनलिकेत ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते.
उभ्याने पाणी प्यायल्यास पचनसंस्थेचं तंत्र बिघडू शकतं. इतकंच नाही तर मूत्रपिंडाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग, जळजळ असे त्रास होऊ शकतात. अपचन होऊ शकतं. शांतपणे आणि बसून पाणी प्यायल्यास ते शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत योग्यपद्धतीने पोहोचतं.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!