सध्याच्या प्रदूषित वातावरणात शरीर अनेक विषारी घटकांच्या संपर्कात येत असतं. शरीर त्यातील विषाक्त घटकांचा दुष्परिणाम भोगत असतं. त्यांची दाहकता कमी व्हावी आणि विषारी घटकांपासून शरीराचा बचाव व्हावा यासाठी योगासनांचा आधार घेणं योग्य ठरतं. अशाच काही योगासनांबद्दल जाणून घेऊ या..
ताडासन करण्यासाठी सरळ उभे रहा. दीर्घ श्वास घेऊन हात वरच्या बाजूला ताणा. हात वर घेताना टाचा उंचवा. श्वास सोडून नेहमीच्या स्थितीत या.
तीरयाक ताडासन करण्यासाठी सरळ उभे रहा. हात वरच्या बाजूला ताणा. दीर्घ श्वास घेताना कंबरेपासून उजव्या बाजूला वाका. आता डाव्या बाजूला वाका. श्वास सोडून नेहमीच्या स्थितीत या.
कटी चक्रासन करताना सरळ उभे रहा. उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात पाठीवर ठेवा. दीर्घ श्वास घेताना कंबरेपासून डाव्या बाजूला वळा.
मग उजव्या बाजूला वळा. उजव्या बाजूला वळताना हातांची स्थिती बदला. श्वास सोडताना पूर्व स्थितीत या. तीरयाक भुजंगासनात पोटावर झोपा. दीर्घ श्वसन करून शरीराचा पुढचा भाग वर उचला. हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. कंबरेपासून उजव्या आणि डाव्या बाजूला वळा. श्वास सोडताना पूर्वस्थितीत या.
उपयुक्त योगासने
Contents hide