कारकिर्दीत उंची गाठण्यासाठी, स्वप्नपूर्तीसाठी शरीराची साथ लाभणं आणि ही साथ लाभण्यासाठी फिटनेसचा मंत्र जपणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हीही फिटनेसचं उद्दिष्ट ठरवा. उद्दिष्ट्यपूर्तीसाठी कामी येतील अशा टिप्स.
समजा तुम्हाला ३0 किलो वजन कमी करायचं आहे. एवढं वजन एका झटक्यात कमी होणार नाही. त्यामुळे कंटाळू नका. आधी छोटं उद्दिष्ट ठेवा. सुरूवातीला एक ते दोन किलो वजन कमी करा. मग पुढे जा. जीमचे मेंबर झालात. आठवड्याचे सातही दिवस राबायचं ठरवलं. परंतु वर्षभरात सात वेळाही जीममध्ये न जाता अचानक आठवड्याचे सात दिवस घाम गाळायला सुरूवात केली की दमणूक होणारच. मग नको ते जीम असं होऊ न जातं. त्यासाठी आठवड्यातून चार ते पाच वेळा जीममध्ये जा. दमवणारा व्यायाम करू नका. शरीराला व्यायामाची सवय होऊ द्या. फॅड डाएटच्या मागे लागू नका. विशिष्ट घटक आहारातून वज्र्य करू नका. कॅलरींवर नियंत्रण ठेवा. प्रथिनयुक्त आहारावर भर द्या. फळं, भाज्या, सॅलाड असा पोषक आहार घ्या. वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या. वेलनेस कोचच्या मदतीने डाएट आणि व्यायामाच्या योजना तयार करा.
उद्दिष्टपूर्तीसाठी काय करावे.?
Contents hide