• Thu. Sep 28th, 2023

आलीशान, रॉयल पॅलेस, ताज पॅलेस, पाकिजा लॉन, शालीमार लॉन यांना नोटीस

ByGaurav Prakashan

Feb 18, 2021

अमरावती : आयुक्त यांचे आदेशानुसार, कोरोना बाबत नियंत्रण प्रसार व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानुसार वलगाव रोड वरील शालीमार लॉन, पाकीजा लॉन, रॉयल पॅलेस, ताज पॅलेस, आलीशान या लॉनमध्ये विवाह समारंभ सुरु होते. या ठिकाणी तपासणी करण्याकरीता मनपा पथक तसेच नागपुरी गेट पोलीस स्टेशन च्या कर्मचारी पथकामार्फत व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रण करण्यात आले. वरील सर्व लॉनला दंडात्मक नोटीस देण्यात आली आहे. विवाह समारंभामध्ये होणारी गर्दी, नियंत्रणामध्ये ठेवण्याकरीता यापुढे अशा प्रकारच्या तपासण्या पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात येणार असुन आपत्ती व्यवस्थापन कायद्यासंदर्भात गुन्हे दाखल करणे व मंगल कार्यालय सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी संबंधीत पथकांना दिले. सदर कार्यवाहीमध्ये पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिन बोंन्द्रे, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, पो.कॉं.तायडे उपस्थित होते. ठोसरे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नागपुरी गेट यांनी सहकार्य केले व तात्काळ दोन शिपाई सोबत दिले.
संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा
मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी १७ फेब्रुवारी, रोजी संस्थात्मक विलगीकरणा संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपआयुक्त सुरेश पाटील, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष उईके, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, भाग्यश्री बोरकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.सिमा नेताम, नगरसचिव मदन तांबेकर, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिन बोंन्द्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, उपअभियंता श्यामकांत टोपरे, डॉ.अजय जाधव, डॉ.मानसी मुरके उपस्थित होते. या बैठकीत संस्थात्मक विलगीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत मनपा आयुक्तांनी सुचना दिल्या की, यापुढे संस्थात्मक विलगीकरणावरच भर देण्यात यावा. गृह विलगीकरणाला शक्यतो परवानगी देवू नयेत आवश्यक परिस्थितीतच सदर परवानगी देण्यात यावी. जे रुग्ण नियमाचे पालन करणार नाही त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. झोन अंतर्गत टेस्टींग वाढविण्यात याव्या या संदर्भात सहाय्यक आयुक्तांनी लक्ष द्यावे. सुपर स्प्रेडर ला तपासणीकरीता सुचित करावे.
झोन स्तरावर कंटेन्मेंट झोन तयार करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात यावी. विवाह समारंभ येथे उपस्थितांची संख्या र्मयादित ठेवतांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करत नाही त्यांच्यावर इनकॅमेरा दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!