• Mon. Sep 25th, 2023

आयुष्य वाहूया……

ByGaurav Prakashan

Feb 18, 2021
    आज आहे जरी । उद्या असणार ।
    नाही मरणार । कुणा ठाव? ।।
    आयुष्याची दोरी । नाही दिसणार ।
    आहे तुटणार । अचानक ।।
    म्हणून जगणे । विचार करून ।
    आनंदे भरून । लोकांसाठी ।।
    जिवंत राहून । नाही मरायचे ।
    आहे जगायचे । मरूनही ।।
    जन्म झाला तर । जगुनच घ्यावे ।
    कशाला मरावे । आत्मघाती? ।।
    दुःख आज जरी । समोर दिसेल ।
    उद्याही असेल । शक्य नाही ।।
    संयमीत रहा । भटकणे सोडा ।
    माणसाला जोडा । स्वबळाने ।।
    प्रेम देणाऱ्याला । प्रेमच मिळेल ।
    विकार जळेल । आपोआप ।।
    अजु म्हणे तुम्हा । भेद विसरूया ।
    आयुष्य वाहूया । सत्कार्यात ।।
    शब्दसखा-
    अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

Thank you for reading this post, don't forget to subscribe!