- आनंद या जीवनाचा
- प्रत्येक क्षणी जगावा
- निर्मळ झऱ्यासारखा
- गुणगुणत वहावा..
- आनंद या जीवनाचा
- इंद्रधनू सारखा खुलावा
- सुरात सूर मिसळुनी
- अलगद हवेत तरंगावा..
- आनंद या जीवनाचा
- खळखळून हसण्यात असावा
- दुःखात वाटेकरी होऊनी
- दुसऱ्यासही आनंद द्यावा..
- आनंद या जीवनाचा
- नात्यांच्या संगतीत असावा
- अमूल्य असे हे जीवन
- एकाकीपणात न संपावा..
- आनंद या जीवनाचा
- देवाच्या चरणी लीन असावा
- सत्संगसेवा करुनी
- जीवनाचा शेवट गोड व्हावा..
Contents hide
- सौ.कोमल तुषार शिंदे,
- धुळे.