• Tue. Jun 6th, 2023

आणखी एक स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

ByGaurav Prakashan

Feb 2, 2021

मुंबई : बॉलिवूड कलाकारांसोबतच स्टार किड्सदेखील सतत चर्चेत असतात. त्यात संजय कपूरची लाडकी लेक शनाया कपूर ही देखील सतत चर्चेत असते. शनाया ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा सुरू आहेत. शनाया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यात शनायाचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
शनायाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. शनायाचा हा फोटो बेडरूम मधला आहे. शनायाने फेस मास्क लावला असून ती वेगवेगळे एक्सप्रेशन देताना दिसत आहे. शनायाच्या समोर लॅपटाप आहे. शनायाने राखाडी रंगाची शार्ट्स, पँट आणि पांढर्‍या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. रविवार हा स्वत: ची काळजी घेण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी आणि स्वत:वर प्रेम करण्यासाठी असतो या आशायाचे कॅप्शन शनायाने त्या फोटोला दिले आहे. थोड्याच वेळात या फोटोला ४७ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.
करण जोहरच्या फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजनंतर शनाया चर्चेत आली आहे. त्या सीरिजमध्ये शनायाचा पॅरिस बॉल म्हणजेच छी इं मधील पदार्पण दाखवण्यात आले होते. शनाया ही संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *