• Sun. May 28th, 2023

आठवणीतलं करजगाव…!

ByGaurav Prakashan

Feb 10, 2021
    करजगावाच्या मातीमधेच कलेचा रंग ओतप्रोत भरला की काय?

येथे सुप्रसिद्ध लेखकांच्या नाटकापासुन, दंडार,धामतिरी कलापथक हे सर्व कलेचा प्रकार सणासुदिमधे विविध सोंग काढणे ,आदी कला गेल्या आठ दशकाच्या आधिपासुन प्रचलित आहे. बर्याच प्रमाणात तमाशा साठी बाहेर गावची पाहुणे कलाकार मंडळी पण बोलावली जायची अशी काही वयोवृद्ध माणस मना़यची. नाटकामधे चौधरी कुटुंबातील,नथ्थु पाटील,त्यांचे जावई सालोडचे वरघट सर’ रामकृष्ण शिंपी राऊत, काशिनाथ पेंन्टर बापुराव तवकार, किसनसिंग राठोड, बाल कलावंत प्रभाकरराव चौधरी बालाजी हिरवे, अशी बरीच मंडळीचा संच. दंडरीमधे भाग घेणारे हरलाल परदेशी, कुसळीच सोंग काढणारे किसन गावंडे (ढोकळ्या) किसन गडलिंग “रायसिंग राठोड मामा हे लुगड नेसायचे, ढोल वाजवनारे रामकृष्णा शिपी(ईरथळवाले),शंकर चिपडे ,आदि बरीच मंडळी होती ,भैरवऩाथ मंदिराच्या जवळ एक मोठे पिंपळाचे झाड होते, त्याचे बाजुला एकदा दंडार झाली होती तेव्हा तेथे ऊजेड करायला (पु्र्ण कार्यक्रमभर) गावाचे कोतवाल गणपत दावला वानखडे हे टेंभा घासलेटचा धरुन ठेवायचे बकेट मधे घासलेट व थोड पाणी असायचे, (झामक झुमक बाई पाण्याले गेली, त्या बाई काव्यान (कावळा) ईची चुंबय नेली व,) मी लहान असल्यामुळ कुसळी सोगांची खुपच भीती वाटायची, मजा यायची. मला ते सार आठवतय, सणासुदिला सोंग काढनारे विठु झोलबा हे व्यक्ती होते असे माझे बाबा मनायचे…….
त्या नंतर नाटक /गोकुळचा चोर/ हे बसवनारे कलावंत सखाराम गोबरु आडे कनिराम महादेव कठातला, फुल्या बाणोंत आदी. /मी नावाचा भदाजी तेली / हे नाटकाचा प्रयोगपण झाला. भग्या डांगे ,मुकना (खोपडीवरुन आलेले) आदी पखवाद भजन मंडळ वाले. तांड्यातील कलावंत कलापथक वाले साखर्यावाला सवाई जो आज बळीराम डीलर जेथे राहतो तेथे राहत होते. यामधे बरीच मंडळी होती. ते स्वता गाने डायलॉग आदी शिकऊन कलापथक करत होते. नासरु कारभारी आबाजी हे नारदाची भुमिका करायचे .बळीराम डीलर साडी नेसायचे छोरा =(केरी कुणं छीए छोरी वात केद मन खरी वाया वेगो क छीए …..कुवांरी.) छोरी= वाया हुयो कोनी मार ,देद प्रश्नेर ऊत्तर ,वसो वर करीऊ भरतार. असे मार्मिक गित जोडायचे….
अहो अमच्या बौध्दपुर्यातही कलाकार मंडळी काय कमी होती. चोनक, ढोलक, फिडल, खंजेरी या वाद्य्यासमवेत गाण मननारी माणस एक-एक कलाकार होती. खंडू मरीभान बरडे, फरीदा वानखडे फिडल बांसरी किसन वानखडे हार्मोनियम मला संच आठवतो बंडुकुमारचे बाबा श्रीराम धवने काका डॉयलॉग मारुन लोकांना हसवायचे, झांजर वाजवायचे.पुढे एक अर्ध शतक असा काळ गेला.
गंगासागर नाटक ज्यांची निर्मिती प्रा.आर. के. वरघट सर यांनी सुरुवात केली यामधे, गित डॉयलॉग हे सर्व वरघट सर व अंबादास चिपडे यांनी सुरुवात केली रामराव भोयर दिग्दर्शक ची जबाबदारी घेऊन पारपाडत यामधे शिवदास जाधव, देविदास आडे,शेषराव चव्हाण (सपावट), विष्णु तवकार, रमेश वरघट, देविदास सिताराम राठोड, भिमराव दिना राठोड, देवानंद राठोड,अंबादास चिपडे, प्रकाश शिंदे, मी एकटा चार भुमिका करत होतो,

1)ज्योतिष
2)रत्नपाल
3)गुराखी
4)प्राण्याचे आवाज काढुन (हरिण बनने)
रक्षक =अंबादास आडे यशवंत गडलिंग असायचे
मेकअप =बापुराव पेंन्टर
लायटिंग =मधुकर चव्हाण भाऊ
तबला =बालाजी हिरवे सुकदेव हिरवे
हार्मोनियम =किसन वानखडे
कधी -कधी नाल साठी मांगकिन्ही येथिल तुकाराम ला बोलवायचे, चोरखोपडी येथील चव्हाणचा साऊंड असायचा. या नाटक संचासोबत गोबरु फुल्या मोजरेता, फत्तु प्रभु चव्हाण, बुवा शंकर चिपडे हे हिरारिने यायचे .
नंतर ………
ऊत्तम राठोड, ब्रम्हा राठोड तारा जाधव महादेव लचमा सुकदेव ऊकंडा आदी मंडळीने कलापथक सुरु केली. तेवढ्यावर नाही तर नंतर
/नको ही लालसा /नाटक गजानन प्रभाते यांनी आम्ही युवा मंडळीचे संचाने पुढाकार घेऊन…… यामधे बंडुकुमार धवने, गजानन नासरु चव्हाण, सुरेश बदु, विष्णु हिरवे, देविदास कसनदास राठोड, वानखडे, पिरा नेमाजी आडे, रमेश बळीराम (धुमा) आदी मंडळीने दोन तिन वर्ष चालवल. त्या नंतर मी एक कलाकार मनुन संस्थेमार्फत पथनाट्य जि प यवतमाळ युनिसेफ व IWMP पानलोट / PEEP /आरोग्य विभाग मार्फत पुर्ण महाराष्टभर यशदा पुणे मास्टर टेृनर म्हनुन काही वर्ष प्रशिक्षण दिल. ठाणे मधे मोखाडा, जव्हार, तलासरी या ता़लुक्यामधे आमची टिम (यवतमाळची) आदिवाशी पाड्यामधे शैक्षनिक आरोग्य ची माहितीपर कार्यक्रम 30.दिवस राहुन आलो .रत्नागिरी ऊस्मानाबाद नागपुर अकोला वाशिम जळगाव पुणे बारामती
बहूल चंन्द्पुर, गडचिरोल,ी नंदुरबार, नगर, मेळघाट आदी बहुतांश जिल्यामधे एकपात्री मधे विविध पशु पक्षाची आवाज काढणे, तोंडातुम वाद्याचा आवाज काढणे. इत्यादी कार्यक्रम करीत गेलो व आज जवळपास सर्व नाट्य कलावंत एकत्र एका आठवणीतलं करजगाव समूहामध्ये एका माळेत गुंतून आहोत त्यापैकी काही कावावंत आम्हास या जगातून सोडून गेलेत याच मनस्वी दु:ख होते. अशी ही कला असे हे कलासंच ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *