- ममतेने भरलेली मुर्ती म्हणजे माझी
- तुमची सगळ्यांचीच आई असते
- रंगारूपाने वेगळी असली तरी
- आईची माया सारखीच असते
- खूप जीव असतो तिचा घरावर
- सगळ्यांसाठी राबराब राबते
- बाबांच्या सोबतीने जीवनाची
- गाडी हिंमतीने ओढत असते
- माझ्याच आईचं सांगतो ती उपाशी
- राहते व मायेने मला घास भरवते
- दिवसरात्र काबाडकष्ट करून नेहमी
- लेकरांची कुटूंबाचीच काळजी करते
- मी कितीही चुकलो तरी रागवत नाही
- उलट मला कौतुकानेच समजावते
- म्हणतात ना जिथे सर्व गुन्हे माफ ते
- एकमेव न्यायालय आई नावाचेअसते
- जिजाऊ साविञी रमाईच्या रूपात चांगल्या संस्काराची शिदोरी असते
- अनेक घडले महापुरूष जिच्यामुळे
- त्यांना घडवणारी एक आईच असते
- अजय बनसोडे
- मु.दापेगाव ता .औसा .जि .लातूर
- 8408042349
Contents hide