सध्या विविध प्रकारच्या डाएट्सचं फॅड आहे. मात्र अशा डाएटसमुळे वजन कमी होतं असलं तरी नियंत्रणात रहातंच असं नाही. त्यामुळे अशा डाएट्सपासून दूर रहा. याविषयी..
अन्नपदार्थांची वर्गवारी चांगल्या आणि वाईट अशा दोन पर्यायांमध्ये केली जाते. कोणते पदार्थ खायचे नाहीत याची यादी दिली जाते.
विशिष्ट पदार्थांवर भर दिलेला असतो. ते कितीही खाल्ले तरी चालतात. फॅड डाएटमध्ये तुमच्या हाती काही मार्गदर्शक तत्त्वं दिली जातात. बारीक होण्यासाठी काय करायचं याचा पाढा वाचला जातो. या तत्त्वाचं पालन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं सांगितलं जातं. वैयक्तिक आवडीनिवडींचा विचार केला जात नाही. झटपट निकालांचे दावे केले जातात. पण दुष्परिणामांबाबत काहीच सांगितलं जात नाही. विशिष्ट उत्पादनं खरेदी करावी लागतात. ठराविक पोषक घटकाचं प्रमाण वाढवावं लागतं. विशिष्ट पोषक घटक पूर्णपणे वज्र्य केले जातात. विशिष्ट डाएटमुळे सेलिब्रिटींना लाभ झाल्याचं सांगितलं जातं. पण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात याची कोणतीही जाण ठेवली जात नाही. अशा डाएट्सना कोणताही वैज्ञानिक पुरावा नसतो.सध्या विविध प्रकारच्या डाएट्सचं फॅड आहे. मात्र अशा डाएटसमुळे वजन कमी होतं असलं तरी नियंत्रणात रहातंच असं नाही. त्यामुळे अशा डाएट्सपासून दूर रहा. याविषयी..
अन्नपदार्थांची वर्गवारी चांगल्या आणि वाईट अशा दोन पर्यायांमध्ये केली जाते. कोणते पदार्थ खायचे नाहीत याची यादी दिली जाते.
विशिष्ट पदार्थांवर भर दिलेला असतो. ते कितीही खाल्ले तरी चालतात. फॅड डाएटमध्ये तुमच्या हाती काही मार्गदर्शक तत्त्वं दिली जातात. बारीक होण्यासाठी काय करायचं याचा पाढा वाचला जातो. या तत्त्वाचं पालन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं सांगितलं जातं. वैयक्तिक आवडीनिवडींचा विचार केला जात नाही. झटपट निकालांचे दावे केले जातात. पण दुष्परिणामांबाबत काहीच सांगितलं जात नाही. विशिष्ट उत्पादनं खरेदी करावी लागतात. ठराविक पोषक घटकाचं प्रमाण वाढवावं लागतं. विशिष्ट पोषक घटक पूर्णपणे वज्र्य केले जातात. विशिष्ट डाएटमुळे सेलिब्रिटींना लाभ झाल्याचं सांगितलं जातं. पण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात याची कोणतीही जाण ठेवली जात नाही. अशा डाएट्सना कोणताही वैज्ञानिक पुरावा नसतो.
अशा डाएट्सपासून रहा दूर …
Contents hide