• Mon. Sep 25th, 2023

अमरावती व अचलपूर शहरात सात दिवसांचे लॉकडाऊन

ByGaurav Prakashan

Feb 22, 2021

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करणे अत्यावश्यक झाले आहे. संक्रमितांची संख्यावाढ रोखण्यासाठी अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत असून, २२ फेब्रुवारीच्या रात्री आठपासून दि. १ मार्चच्या सकाळी सहापयर्ंत तिथे संचारबंदी लागू असेल. वैद्यकीय व जीवनावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. कोरोना साथीवर मात करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे. नागरिकांनी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केले.
जिल्ह्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी रविवारी दुपारी जिल्हाधिकारी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले. महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त आरती सिंह, पोलिस अधीक्षक हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, महापालिकेकडून बबलू शेखावत, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, बाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. गत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक केसेस होत्या, त्यापेक्षाही केसेस आता आहेत. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्व सेवा बंद राहतील. या काळात सर्व नागरिकांनी स्वत:ची व इतरांचीही काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हातांची स्वच्छता व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. हे पालन न केल्यास आणखी रुग्णांची संख्या वाढून लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. महापालिका, पोलिस, वाहतूक शाखा यांनी संयुक्त मोहिम राबवून नियमभंग करणा-यांवर कडक कारवाई व्हावी. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या सेवा सुरू राहतील, पण तिथेही गर्दी टाळण्यासाठी वेळेची र्मयादा राहील. संचारबंदीचा भंग करणार्‍यांवर वेळीच कारवाई व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. अमरावतीत १६00 खाटांची उपलब्धता आहे. खासगी रुग्णालयांतील खाटांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आवशयक तिथे सेंटर्स वाढविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर नागरी व ग्रामीण क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरु राहील. यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरु राहतील. शासकीय कार्यालयांतून १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी उपस्थित असतील. भोजनालये, उपाहारगृहे प्रत्यक्ष सुरु न ठेवता पार्सल सेवा देऊ शकतील. लग्नासाठी फक्त २५ व्यक्तींना परवानगी अनु™ोय राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी यांना ई- माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे यासाठी परवानगी राहील. मालवाहतूक व वाहतुकीवर निबर्ंध नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनु™ोय राहतील. तीनचाकी गाडीमध्ये (उदा. ऑटोरिक्षा) चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५0 टक्के प्रवासीसह सोशल डिस्टन्सिंग व निजंर्तुकीकरण करुन वाहतुकीसाठी परवानगी अनु™ोय राहील. सर्व धार्मिक स्थळे एकाचवेळी १0 व्यक्तीपयर्ंत र्मयादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. ठोक भाजीमंडई पहाटे तीन ते सहादरम्यान सुरु राहील. तिथे केवळ किरकोळ विक्रेत्यांना येता येईल. शाळा, शिकवण्या बंद राहतील. व्यायामशाळा, चित्रगृहे, तरणतलाव, उद्याने बंद राहतील. सर्व प्रकारचे कार्यक्रम, संमेलने बंद राहतील. या आदेशानुसार सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते ५ सुरू राहतील. आठवड्याअखेर शनिवारपासून सोमवारपयर्ंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. आठवड्याअखेरच्या संचारबंदीत दुधविक्रेते, डेअरी यांची दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहतील.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!