• Tue. Sep 26th, 2023

अमरावती जिल्हय़ात लॉकडाऊन

ByGaurav Prakashan

Feb 22, 2021

अमरावती : अमरावती जिल्हय़ात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून अमरावती जिल्ह्य़ासाठी लॉकडाऊनचे निबर्ंध लावण्यात आले आहेत.२२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत जिल्हय़ात लॉकडाऊन करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे. जीवनाश्यक वस्तूवगळता इतर सर्व प्रतिष्ठाने, दुकाने र्मयादित वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे जिल्हयावर पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की ओढावली आहे.
जिल्ह्य़ातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून सदर भागाच्या सीमा निश्‍चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निबर्ंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ, राजकीय सभा यावर निबर्ंध लादण्यात आले असून, जीवनाश्यक वस्तूंची दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. १ मार्चपर्यंत सर्व आदेश लागू असून परिस्थिती नियंत्रणात न आल्यास यापेक्षाही कडक निबर्ंध लादण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!