अमरावती : अमरावती हे ५ जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असून जवळपास २८ लाख लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.विदर्भांतील दुसर््या क्रमांकाचे शहरअसून सुद्धा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणे ही मोठी शोकांतिका असल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या लक्षात आणून दिले.आज खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीयआरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली व अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची असणारी नितांत आवश्यकता त्यांचे लक्षात आणून दिली.अकोला,यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे,अमरावतीत एक जिल्ह्या सामान्य रुग्णालय,एक जिल्हा स्त्री रुग्णालय,एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहे परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने गोर गरीब रुग्णांना,अतिगंभीर रुग्णांना येथून १५0 किमी दूर नागपूर येथे जावे लागते या सर्व बाबी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. महराष्ट्र शासनाने १२ नवीन शासकीय महाविद्यालये सुरु करण्याचाप्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे,त्यात अमरावतीचे सुद्धा नाव आहे,करीताकेंद्र शासनाने त्वरित मान्यता देऊन २0२१/२२ या वर्षात हे शासकीयवैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू करावे अशी मागणी केली.या बाबीचागांभीयार्ने विचार करून लवकरच मान्यता देण्याचे अभिवचन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी खासदार सौ नवनीत रवी राणा यांना यावेळीदिले.