अमरत्व नाही…….

    टाळता येईना । मृत्यु कोणालाही ।
    अमरत्व नाही । कोणासही ।।
    देह अपराधी । मनास यातना ।
    ताब्यात रसना । नाही आता ।।
    कित्येक माणसे । बेघर झालीत ।
    ज्यांनी नियमित । द्वेष केले ।।
    काळापुढे कधी । कोणाचे चालेना ।
    दुःखात हसेना । कोणीपण ।।
    रागात रहाणे । मांस,मच्छी खाणे ।
    ऐकायचे गाणे । बिनकानी ।।
    वासना शिरली । युवकांच्या मनी ।
    आयुष्याचा धनी । विसरलो ।।
    अशाने प्रगती । होणारच कशी? ।
    लागली बुरशी । मनी जर ।।
    एक होऊनिया । एक मार्ग धरू ।
    जीवनी सुधरू । आतातरी ।।
    प्रगतीचा विडा । चला उचलूया ।
    समृद्धी आणूया ।देशामध्ये ।।
    अजुचे म्हणणे । ऐका आजतरी ।
    वसतो श्रीहरी । एकोप्यात ।।
    शब्दसखा-

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अजय रमेश चव्हाण,

    तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७