मुंबई: अभिनय कौशल्यानं बॉलिवीडूमध्ये विशेष ओळख निर्माण करणार्या अभिनेत्यांच्या यादीत के.के मेननचं नाव आघाडीवर आहे. के.के मेनन या अभिनेत्यानं हिंदीसोबतच गुजराती, तामीळ आणि तेलगू सिनेमांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
व्हिलनसोबतच कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारत के.के मेनने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईमध्ये नुकताच सिनेसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात के.के मेननला अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
के.के मेननने इन्स्टाग्रामवर पुरस्काराचे फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसचं दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांचेही आभार मानले. अनेक चाहत्यांनी के.के मेननला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केलाय. दरवर्षी सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणार्या कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
के.के मेननने रंगभूमीवरुन अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर काही मालिकांमध्ये नशीब आजमवलं. १९९५ सालात आलेल्या नसीम या सिनेमात के.के मेननने एक लहानशी भूमिका साकराली होती. भोपाळ एक्सप्रेस या सिनेमातून के.के मेनन मुख्य नायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. ब्लॅक फ्राईडे, सरकार, लाईफ इन मेट्रो, हैदर यारख्या सिनेमांमधून के.के मेननने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेता के.के मेनन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
Contents hide