• Wed. Sep 27th, 2023

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा अमरावती जिल्हा दौरा

ByGaurav Prakashan

Feb 3, 2021

अमरावती : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे 4 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
गुरुवार दि. 4 फेब्रुवारी रोजी, सकाळी 6 वाजता शासकीय निवासस्थान बुलडाणा येथून शासकीय वाहनाने बुलडाणा, खामगाव, अकोला मार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत विविध आढावा बैठकींना उपस्थिती. रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन, राखीव व मुक्काम करतील.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 5 फेब्रवारी रोजी सकाळी 8 वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत अमरावती येथून यवतमाळकडे प्रयाण करतील.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!