यवतमाळ : तालुक्यातील एका बालिकेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला यवतमाळ येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दहा वष्रे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.
ज्ञानेश्वर मोहन राठोड (२३) ता. घाटंजी असे आरोपीचे नाव आहे. २२ फेब्रुवारी २0१९ रोजी आरोपी ज्ञानेश्वरने एका बालिकेचे ईल फोटो काढले. ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्यासाठी भीती दाखविली. तिला घाटंजीतील एका गैरजवर बोलाविले. लगतच्या टिनाच्या शेडमध्ये तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची व ईल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १ जून २0१९ रोजी आरोपी तिच्या घरी गेला. तिला नेहमीसाठी आपल्याशी संबंध ठेवण्याची धमकी दिली. अन्यथा बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडित बालिकेने या प्रकरणी घाटंजी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
वैद्यकीय तपासणी व तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर भादंवि कलम ३७६, ५0६ आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. या प्रकरणात चार साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित बालिका व डॉक्टरची साक्ष महत्वाची ठरली. जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. पेठकर यांनी आरोपीला बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार दहा वष्रे सक्त मजुरी व ५00 रुपये दंड ठोठावला. तसेच भादंवि ५0६ कलमानुसार पाच वष्रे सक्त मजुरी व ५00 रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी काम पाहिले.
(Image Credit : Maharashtra Times)